UNION BUDGET २०१९: अर्थसंकल्पात रेल्वेसाठी काय आहेत तरतुदी - निर्मला सीतारामन
रेल्वेच्या पायाभूत सुविधात सुधारणा करण्यासाठी २०३० पर्यंत ५० लाख कोटींची आवश्यकता. २०१७ पासून रेल्वेचा अर्थसंकल्पाचा वार्षिक अर्थसंकल्पात समावेश करण्यात आला आहे.

रेल्वे अर्थसंकल्प
नवी दिल्ली - अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी यावर्षीचा अर्थसंकल्प संसदेत सादर केला. सलग दुसऱ्यांदा सत्तेत आलेल्या मोदी सरकारकडून प्रत्येक क्षेत्राला अर्थसंकल्पाद्वारे काहीतरी देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. २०१७ पासून रेल्वेचा अर्थसंकल्पाचा वार्षिक अर्थसंकल्पात समावेश करण्यात आला आहे. २०१९ च्या अर्थसंकल्पात रेल्वेसाठी खालील तरतुदी करण्यात आल्या आहेत.
- रेल्वेच्या पायाभूत सुविधात सुधारणा करण्यासाठी २०३० पर्यंत ५० लाख कोटींची आवश्यकता. यासाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूकीची गरज
- मेट्रोचे ६५७ किलोमीटरचे जाळे उभारण्यात येणार
- उपनगरीय रेल्वेमध्ये गुंतवणूक गरजेची. एसपीव्ही व्यवस्थेद्वारे आरआरटीएस रेल्वेचा विकास साधण्यासाठी प्रोत्साहन देण्याचे गरज
- रेल्वे सेवेत गतिमानता येण्यासाठी पीपीपी चा वापर करण्यात येणार
- रेल्वे स्थानकांच्या विकासासाठी यावर्षी मोठी योजना राबवण्यात येणार