महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

जाणून घ्या पर्रीकरांसंदर्भातील 'या' १० गोष्टी, ज्या तुम्हाला क्वचितच माहीत असतील

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते असलेले पर्रीकर सर्वांनाच ठाऊक आहेत. मात्र, पर्रीकरांबाबत, अशा काही गोष्टी आहेत, ज्या सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचलेल्या नाहीत. जाणून घेऊया पर्रीकरांबाबतच्या 'या' मजेशीर आणि अज्ञात १० गोष्टी.

जाणून घ्या पर्रीकरांसंदर्भातील 'या' १० गोष्टी

By

Published : Mar 17, 2019, 8:55 PM IST

पणजी- गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या निधनानंतर अनेकांनी दु:ख व्यक्त केले आहे. आयआयटीएन्स ते केंद्रात संरक्षण मंत्री, असा पर्रीकरांचा प्रवास सर्वश्रुत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते असलेले पर्रीकर सर्वांनाच ठाऊक आहेत. मात्र, पर्रीकरांबाबत, अशा काही गोष्टी आहेत, ज्या सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचलेल्या नाहीत. जाणून घेऊया पर्रीकरांबाबतच्या 'या' मजेशीर आणि अज्ञात १० गोष्टी.

१) पर्रीकर यांचा पोशाख हा त्यांची ओळख बनला होता. तो त्यांचा 'सिग्नेचर लूक' होता. राजकीय बैठक असो, की स्वत:च्या मुलाचे लग्न पर्रीकर नेहमी याच पोशाखात दिसून येत असत. हाफ स्लिवस बुश शर्ट, क्रिज टाऊजर्स आणि साधे फुटवेअर परिधान केलेले पर्रीकर आजही अनेकांना आठवतात.

२) लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना पर्रीकरांनी व्यक्तिगत दु:खाला काहीच स्थान दिले नाही. २००० साली गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर २००१ साली पर्रीकरांच्या पत्नी मेधा यांचा कर्करोगाने मृत्यू झाला होता. मात्र, यानंतर खचून न जाता पर्रीकरांनी आपली जबाबदारी पार पाडली. तसेच उत्पल आणि अभिजित या दोन मुलांचाही सांभाळ केला.

३) पर्रीकरांनी लोकप्रतिनिधी असताना कधीच सरकारी फायदे उचलेले नाहीत. मुख्यमंत्री असतानाही ते सरकारी बंगल्याऐवजी स्वत:च्या छोट्याशा घरात राहायचे. विरोधी पक्षनेते असताना त्यांना मिळालेली 'इनोव्हा' हीच कार त्यांनी वापरली.

४)पर्रीकरांचे पूर्ण नाव 'मनोहर गोपालकृष्ण प्रभू पर्रीकर' असे आहे.

५) स्वत:च्या मोबाईल फोनचे बील सरकारी खर्चातून नाही, तर स्व-खर्चातून करायचे.

६) वयाच्या ६२ व्या वर्षांतही पर्रीकर नेहमी कामात व्यस्त असायचे. ते दिवसातील १६-१८ तास काम करायचे.

७) पर्रीकरांना गोव्याचे 'मिस्टर क्लिन' म्हणूनही ओळखले जात होते. अवैधरित्या कोळसा खाण व्यवसाय करणाऱ्याचे रॅकेट पकडून अनेक व्यापाऱ्यांचे टेंडर्स पर्रीकरांनी रद्द केले होते. तसेच भ्रष्ट अधिकाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यातही पर्रीकर तत्पर असायचे.

८) आयआयटी मुंबईतून पर्रीकर १९७८ साली धातू अभियांत्रिकीमध्ये (मेटॅलार्जिकल इंजिनिअर) पदवीधर झाले. पर्रीकर हे भारतातील पहिले, असे आयआयटीएन्स होते जे आमदार झाले.

९) पर्रीकर अनेकदा रिक्षा, बस आणि स्कूटरवरून गोव्यात प्रवास करताना दिसून आले. सर्वसामान्य माणसांप्रमाणे पर्रीकरांची वागणूक राहिलेली आहे. यासाठी गोव्यातील अनेक जण त्यांची आठवण काढतात.

१०) पर्रीकरांना पंतप्रधान नरेंद्र मोदींचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाते. मोदी हे भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार असणार आहेत, असे पर्रीकरांनी मोदी लाटेपूर्वीच सांगितले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details