महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

पतंग उडविणार असाल तर सावधान..! कोरोनाचा प्रसार होणार असल्याचे तज्ज्ञांचे मत - JAIPUR NEWS IN HINDI

एखादा व्यक्ती कोरोनाग्रस्त किंवा कोरोनासंशयित असेल आणि तो जर पतंग उडवत असेल तर कोरोनाचा मोठ्या प्रमाणात संक्रमण होऊ शकणार असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे. अक्षय तृतीया सणाला राजस्थानमध्ये पतंग उडविले जातात.

corona virus
पतंग उडविणार असाल तर सावधान..! कोरोनाचा प्रसार होणार असल्याचे तज्ज्ञांचे मत

By

Published : Apr 16, 2020, 6:26 PM IST

जयपूर -एखादा व्यक्ती कोरोनाग्रस्त किंवा कोरोनासंशयित असेल आणि तो जर पतंग उडवत असेल तर कोरोनाचा मोठ्या प्रमाणात संक्रमण होऊ शकणार असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे. अक्षय तृतीया सणाला राजस्थानमध्ये पतंग उडविले जातात. या पार्श्वभूमीवर जयपूरच्या एका रुग्णालयातील डॉ. नरेश जाखोटिया यांनी सांगितले की, एकमेकांचे पतंग कापल्यामुळे कोरोना आजाराचा प्रसार होऊ शकतो.

अक्षय तृतीयेला राजस्थानमध्ये पतंग उडविताना लोक एकमेकांचे पतंग कापतात, त्यानंतर काही जण हा पतंग घेऊन स्वत: उडवतात. यामुळे कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रसार होऊ शकतो. डॉ. नरेश जाखोटिया यांनी सांगितले, की पतंगावर कोरोना विषाणू 4 तास राहू शकतो तर पतंगाच्या दोऱ्यावर 8 ते 10 तास राहू शकतो. तसेच प्लास्टिकच्या पतंगावर हा विषाणू 3 दिवस राहू शकतो.

ABOUT THE AUTHOR

...view details