रायगडा (ओडिसा) - अनेकांची साप पाहिल्यावरच पाचावर धारण बसते. त्यातच कोबरा नाग आणि तोही तब्बल १२ फूट लांबीचा कोणाच्या निदर्शनास पडल्यास त्याची बोलती बंद झाली नाही तर नवलच. असाच एक कोबरा ओडिशाच्या रायगडाच्या सेशाखल परिसरात सापडला. येवढा मोठा साप पकडल्याने त्याला पाहण्यासाठी अनेकांनी गर्दी केली.
पकडण्यात आलेला किंग कोब्रा सीआरपीएफ कॅम्पमध्ये किंग कोब्रा ओडिशातील रायगडा येथील सेशाखल भागातील सीआरपीएफ कॅम्पमध्ये सकाळी किंग कोब्रा प्रजातीचा साप घुसला होता. याची माहिती सर्पमित्रांना देण्यात आली. यावेळी सर्पमित्राने सीआरपीएफ कॅम्पमध्ये घुसलेल्या १२ फूट लांब किंग कोब्राला यशस्वीरित्या पकडले. यावेळी एवढा मोठा साप पाहण्यासाठी बघ्यांची एकच गर्दी झाली होती. सर्पमित्रांनी १२ फूट लांब किंग कोब्राला वनविभागाकडे सोपवले. वनविभागाने किंग कोब्राला गुम्मा जंगलात नंतर सोडून दिले.