रुद्रपूर (उत्तराखंड) - जगभर हाहाकार माजवणाऱ्या कोरोना विषाणूमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 3 मेपर्यंत संचारबंदी घोषित केली आहे. मात्र, हातावर पोट असणाऱ्या कामगारांना या निर्णयामुळे मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे. उत्तराखंड राज्यातील रुद्रपूर येथील पोलीस निरीक्षक आणि शिपायांनी 15 कुटुंबांंना दत्तक घेतले आहे. ज्यामुळे या सर्वांना दोन्ही वेळेचे जेवण मिळणार आहे. यामुळे या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
उत्तराखंड पोलिसांना सलाम..! पोलीस अधिकारी अन् सहकाऱ्यांनी उचलली गरजूंच्या जेवणाची जबाबदारी - corona warriors kichha
जगभर हाहाकार माजवणाऱ्या कोरोना विषाणूमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 3 मे पर्यंत संचारबंदी घोषित केली आहे. मात्र, हातावर पोट असणाऱ्या कामगारांना या निर्णयामुळे मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे. उत्तराखंड राज्यातील रुद्रपूर येथील पोलीस निरीक्षक आणि शिपायांनी 15 कुटुंबांंना दत्तक घेतले आहे.
उत्तराखंड पोलिसांना सलाम..! पोलिस अधिकारी अन् सहकाऱ्यांनी उचलली गरजूंना जेवू घालण्याची जबाबदारी
पोलीस अधिकारी राजेंद्र प्रसाद आणि अजय कुमार यांनी सुरुवातीपासूनच गरजूंना स्वत:च्या खिशातून मदत केली. प्रसाद यांनी सांगितले की, संचारबंदीच्या काळात मजुरांना रोजगार नसल्यामुळे त्यांच्या दोन्ही वेळेच्या जेवणाचे हालं होत आहेत. त्यामुळे आम्हाला वाटले की, जेवढ्यांना शक्य आहे त्यांना स्वत: पैसे खर्च करून त्यांना जेवू घालण्याची जबाबदारी उचलावी.