महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

VIDEO : कार्यालयीन वेळेत बनवलेला टिक-टॉक व्हिडीओ पडला महागात - जिल्हाधिकारी

खम्माम महानगरपालिकेचे कर्मचारी काम सोडून टिक-टॉक व्हिडिओ बनवण्यात मग्न असायचे. महानगरपालिकेच्या आयुक्तांनी कर्मचाऱ्यांना ताकीदही दिली होती. परंतु, तरीही कर्मचाऱयांनी व्हिडिओ बनवणे चालूच ठेवले होते.

महानगरपालिकेच कर्मचारी टिकटॉक बनवताना

By

Published : Jul 16, 2019, 8:50 PM IST

हैदराबाद - तेलंगणा राज्यातील खम्माम महानगरपालिकेचे कर्मचारी काम सोडून टिक-टॉक व्हिडिओ बनवण्यात मग्न असायचे. महत्वाची बाब म्हणजे कर्मचारी कार्यालयीन वेळेत व्हिडिओ बनवत होते. याबाबत, महानगरपालिकेच्या आयुक्तांनी कर्मचाऱ्यांना ताकीदही दिली होती. परंतु, तरीही कर्मचाऱयांनी व्हिडिओ बनवणे चालूच ठेवले होते.

टिक-टॉक व्हिडिओ

खम्माम महानगरपालिकेतील पुरुष कर्मचाऱ्यांसह महिला कर्मचारीही टिक-टॉक व्हिडिओमध्ये चित्रपटातील गाणी, डायलॉग आणि विविध प्रसंगावरती अभिनय करताना दिसून येत आहेत. यावर, बोलताना खम्माम जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आर. व्ही कर्नन म्हणाले, आम्हाला याबाबत ईटीव्ही भारतच्या माध्यमातून माहिती मिळाली. याबाबत मी महानगरपालिकेच्या आयुक्तांना मेमो पाठवला आहे आणि याबाबत स्पष्टीकरण मागितले आहे.

जिल्हाधिकाऱ्यांच्या मेमोला उत्तर देताना आयुक्तांनीही लिखित अहवाल पाठवला. आयुक्तांच्या अहवालावर कारवाई करताना करारावर भर्ती करण्यात आलेल्या ९ पुरुष आणि महिला कर्मचाऱ्यांना त्यांच्या पदावरुन पायउतार करण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details