महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधींची ७५ वी जयंती, ज्येष्ठ नेत्यांनी पुष्पांजली वाहिली - पंतप्रधान राजीव गांधी

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या 75 व्या जयंतीनिमित्त काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी राजीव गांधींचे स्मृतीस्थळ असलेल्या वीर भूमी येथे जाऊन त्यांना पुष्पाजंली वाहिली आहे.

दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधींची ७५ वी जयंती, ज्येष्ठ नेत्यांनी पुष्पांजली वाहिली

By

Published : Aug 21, 2019, 9:49 PM IST

नवी दिल्ली - माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या 75 व्या जयंतीनिमित्त काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी राजीव गांधींचे स्मृतीस्थळ असलेल्या वीर भूमी येथे जाऊन त्यांना पुष्पाजंली वाहिली आहे. त्यांचा जन्म २० ऑगस्ट १९४४ ला झाला होता. मंगळवारी सकाळी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, प्रियांका गांधी, राहुल गांधी यांनी राजीव गांधींच्या समाधीस्थळी त्यांना आदरांजली वाहिली. यावेळी प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा आणि त्यांची मुलगी मिराया वाड्रा उपस्थित होते.

दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधींची ७५ वी जयंती, ज्येष्ठ नेत्यांनी पुष्पांजली वाहिली


राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त काँग्रेस पक्ष या आठवड्यात देशभरात अनेक कार्यक्रमाचे आयोजन करणार असल्याचे राहुल गांधींनी सोमवारी ट्विट केले होते. 'या आठवड्यामध्ये आम्ही राजीव गांधीच्या 75 व्या जयंतीनिमित्त देशभरामध्ये स्मृती कार्यक्रम आयोजीत करणार आहोत. प्रत्येक दिवशी मी माझ्या वडिलांच्या उल्लेखनीय कामगिरीकडे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करेल. आज माहिती तंत्रज्ञान क्रांतीविषयी माहिती दिली आहे', असे टि्वट राहुल गांधी यांनी केले होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनीही माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त त्यांना पुष्पाजंली वाहिली.


काँग्रेसचे सरचिटणीस के सी वेणुगोपाल यांनी देशात रक्तदान शिबिरे, वृक्ष लागवड, चर्चासत्रे असे सामाजिक कार्यक्रम आयोजीत करावी, असे आदेश नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना दिले आहेत.


राजीव गांधी हे भारताचे सातवे पंतप्रधान होते. जेव्हा राजीव गांधीनी पंतप्रधान पदाची सूत्रे हातात घेतली तेव्हा ते भारताचे सर्वांत तरुण पंतप्रधान बनले. राजीव गांधीच्या आधुनिक विचारांचा पगडा त्यांच्या सुधारणावादी कामांतून पहायला मिळाला. संगणकयुगाची त्यांनी भारताला ओळख करून दिली. तसेच टेलिकॉमच्या क्रांतीची सुरवात ही त्यांच्या धोरणांतून झाली. राजीव गांधी यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.

ABOUT THE AUTHOR

...view details