अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्याच भारत भेटीतून लष्करी सहकार्याशिवाय जास्तीत जास्त देखाव्याचाच भाग अधिक असणार आहे. या भेटीत भारत आणि अमेरिकेतील देशांतर्गत चिंतेच्या मुद्यांवर गोडगोड बोलण्यापेक्षा अधिक काही साध्य करण्याची आशा भारताला बाळगणे शक्य नाही.
२४ फेब्रुवारीला अहमदाबादमध्ये नमस्ते ट्रम्प हा कार्यक्रम होत आहे, त्याकडे ह्यूस्टन, टेक्सासमध्ये २२ सप्टेंबर, २०१९ रोजी झालेल्या 'हाउडी मोदी' कार्यक्रमाची परतभेट म्हणून पाहता येईल. मात्र सोमवारपासून सुरू होणाऱ्या दोन दिवसीय भेटीत लष्करी सहकार्यात खूप काही गोष्टींचा समावेश केला जाण्याची शक्यता आहे. पंतप्रधान मोदी यांच्या अध्यक्षतेखालील सुरक्षाविषयक केंद्रीय मंत्रिमंडळ समिती बैठकीत अमेरिकेकडून भारतीय नौदलासाठी २४ एमएच-६०(ज्यांची किमत १५,२०० कोटी रूपये आहे) आणि आणखी ६ अपाचे लढाऊ हेलिकॉप्टर्स(किमत ५,६९१ कोटी रूपये) खरेदी करण्याला मंजुरी दिली, त्यावरून असे संकेत मिळत आहेत.
लष्करनिहाय, मोदी-ट्रम्प यांच्या भेटीतून सर्वोच्च महत्वाचा मुद्दा हा प्राथमिक विनिमय आणि सहकार्य करार(बीईसीए) हाच असेल. हा करार भारताला अमेरिकेच्या अत्यंत प्रगत आणि डिजिटल प्रतिमा आणि नकाशांचा समावेश असलेल्या अचूक भूस्थानविषयक माहिती उपलब्ध करून देण्यात पायाभूत करार असेल.
बीईसीए अमेरिकेकडून भारताला शस्त्रसज्ज युएव्ही आणि किलर ड्रोन्स मिळवण्याच्या दृष्टिने पहिले पाऊल आहे. अमेरिकेच्या अत्यंत आधुनिक शस्त्रांचे किलर ड्रोन्स हे घातक घटक आहेत. या युएव्हीचा परिणामकारक वापर करण्यासाठी अचूक भूस्थानविषयक माहितीची उपलब्धता अनिवार्य आहे. दुसऱया शब्दांत सांगायचे तर, भारताला अत्यंत घातक असे युएव्ही मिळण्यासाठी बीईसीए करार हा अग्रदूत असेल.
२०१६ मध्ये करण्यात आलेल्या पुरवठा साखळी विनिमय सामंजस्य करार(एलईएमओए) आणि २०१८ मध्ये केलेल्या कम्युनिकेशन्स कंपॅटिबिलिटी अँड सिक्युरिटी अग्रीमेंट करारानंतर बीईसीए हा भारत अमेरिका लष्करी सहकार्यात तिसरा महत्वाचा करार असेल. एलईएमओए लष्करी सुविधांचा परस्परांना वापर करण्यास परवानगी देतो तर सीओएमसीएएसए भारतात संदेशवहन उपकरणे ठाण मांडण्यास अमेरिकेला परवानगी देतो. त्याशिवाय लष्करी आकडेवारी आणि माहितीची पारेषण आणि त्वरित आदानप्रदान करण्यास परवानगी देतो. पण जगातील दोन सर्वात मोठ्या लोकशाहींच्या सर्वोच्च प्रमुखांची भेट ताकदवान बनत चाललेल्या चीनच्या संदर्भात डावपेचात्मक आघाडीचा संदेश कळवण्यासाठी असल्याचा अर्थ काढला जात आहे. परंतु अध्यक्ष ट्रम्प यांच्या भारत भेटीमुळे अनेक चुकीच्या समजुती दूर होणार आहेत. तसेच भारत अमेरिका मैत्रीचा देखावा जास्तीत जास्त ठळकपणे समोर येण्यास मदत होणार आहे.
अध्यक्ष ट्रम्प नुकतेच महाभियोग प्रक्रियेतून बाहेर आले आहेत तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची चमक आर्थिक जखमांनी आणि वादग्रस्त नागरिकत्व सुधारणा कायद्याला होत असलेल्या व्यापक विरोधामुळे अडचणीत सापडलेल्या देशात झपाट्याने हरवत चालली आहे. बुधवारी, अध्यक्षांनी भारताचा प्रवास सुरू करण्याच्या आठवडाभर आधी, अमेरिकेच्या आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्य आयोगाने भारताच्या वादग्रस्त नागरिकत्व सुधारणा कायद्याबाबत तथ्यांबाबत पत्रक जारी केले. ज्यामुळे दोन देशातील वातावरण कडवट झाले आहे.