त्रिशूर - लग्न करण्यासाठी वयाची कोणतीच मर्यादा नसते हे केरळमधील एका जोडप्याने सत्यामध्ये उतरवले आहे. शहरामधील शासकीय वृद्धाश्रमामधील कोचानियन मेनन (67) आणि लक्ष्मी अम्मालू (66) यांचा आज विवाह पार पडला.
कोचानियन मेनन आणि लक्ष्मी हे दोघेही बऱ्याच वर्षापासून एकमेंकाना ओळखतात. लक्ष्मी यांचे कोचानियन हे लक्ष्मी अम्माल यांचे दिवंगत पती कृष्णअय्यर यांचे सहाय्यक होते. कृष्णअय्यर यांच्या मृत्यूनंतर कोचानियन यांनी वेळोवेळी लक्ष्मी यांना मदत केली. कोचानियन यांनी लक्ष्मी यांना रामवर्मपुरम वृद्धाश्रमात सुखरुप सोडले. त्यानंतर त्या दोघांची 5 वर्षे भेट झाली नाही. काही वर्षांनंतर ते रामवर्मपुरम वृद्धाश्रमात एकमेकांना भेटले आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.