महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

केरळ : संचारबंदी काळात नमाज पठणसाठी जमलेल्या 30 जणांना अटक - kerala corona cases

कोझिकोड जिल्हा, त्रिशूल जिल्ह्यातील चावक्कड आणि तिरुवअनंतपुरम मधील पेरिगमाला येथे पोलिसांनी कारवाई करत 30 जणांना अटक केली आहे.

file pic
संग्रहित छायाचित्र

By

Published : Apr 4, 2020, 11:44 PM IST

तिरुवनंतपुरम - कोरोनाचा फैलाव होऊ नये म्हणून देशभरामध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र, संचारबंदीचे पालन होत नसल्याचे अनेक ठिकाणी दिसून येत आहे. केरळमध्ये संचारबंदी काळात नमाज पठणसाठी विविध मशिदींमध्ये जमलेल्या 30 जणांना पोेलिसांनी अटक केली आहे.

कोझिकोड जिल्हा, त्रिशूल जिल्ह्यातील चावक्कड आणि तिरुवअनंतपुरम मधील पेरिगमाला येथे पोलिसांनी कारवाई करत 30 जणांना अटक केली आहे. संचारबंदीचे उल्लंघन करत एकत्र जमल्याने ही कारवाई केली. तिरुअनंतरपूरम जिल्ह्यात 11 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर त्रिशुल जिल्ह्यात सायंकाळी नमाज पठणसाठी जमलेल्या 5 व्यक्तींना ताब्यात घेतले आहे. इतर ठिकाणीही पोलिसांनी नमाज पठण करणाऱ्यांना ताब्यात घेतले आहे.

केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी कोरोना नियंत्रणात आल्याचा दावा केला आहे. कसरगोड जिल्ह्यामध्ये काल 7 कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आले तर एकून 9 कोरोनाग्रस्त काल (शुक्रवारी) दिवसभरात सापडले. केरळमध्ये 295 कोरोनाचे सक्रिय रुग्ण असून 2 जणांचा मृत्यू झाला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details