तिरुवअनंतपुरम -बाल लैगिंक अत्याचार प्रकरणी (POCSO) अटकेत असलेल्या आरोपीने पळून जाण्यासाठी थेट समुद्रातच उडी घेतल्याची घटना केरळमधील कसरगोड जिल्ह्यात घडली. आज(बुधवार) सकाळी जिल्ह्यातील कसबा येथे ही घटना घडली. पुरावे जमा करण्यासाठी पोलीस आरोपीला समुद्र किनारी घेवून गेले होते. मात्र, त्याने पळून जाण्यासाठी समुद्रात उडी घेतल्याने आरोपी बेपत्ता आहे.
केरळ: बाल लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपीची समुद्रात उडी...शोध सुरू - kasargod district child abuse
महेश असे आरोपीचे नाव असून घराशेजारील बालकावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी त्याच्यावर मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यासंबंधी पुरावे गोळा करण्यासाठी पोलीस त्याला कसबा येथील समुद्र किनारी घेवून गेले होते. तेव्हा ही घटना घडली.
बेपत्ता आरोपीचा शोध सुरु
महेश असे आरोपीचे नाव असून घराशेजारील बालकावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी त्याच्यावर मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यासंबंधी पुरावे गोळा करण्यासाठी पोलीस त्याला कसबा येथील समुद्र किनारी घेवून गेले होते. मात्र, पळून जाण्यासाठी त्याने समुद्रात उडी घेतली. दोन पोलिसांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा पत्ता लागला नाही. आरोपीचा शोध घेण्यासाठी आता पाणबुड्यांना बोलाविण्यात आले आहे.