कोझिकोड - केरळमधील कोझिकोड आंतरराष्ट्रीय विमानतळावर काल(शुक्रवार) रात्री एअर इंडियाच्या विमानाचा लँडिग होता असताना अपघात झाला. या विमानाचा डिजिटल फ्लाईट डेटा रेकॉर्डर (DFDR) हाती लागला आहे. नागरी हवाई उड्डान विभागाच्या महासंचालकांनी याबद्दल माहिती दिली. लँडिंग दरम्यान झालेल्या या अपघातात विमानाचे दोन तुकडे झाले तर दोन पायलटसह 18 जणांचा मृत्यू झाला आहे. दुबईवरून हे विमान येत होते.
यासोबतच ‘कॉकपिट व्हाईस रेकॉर्डर’ मिळवण्यासाठी विमानाचा काही भाग कापण्यात आल्याचे डीजीसीएने सांगितले. नागरी उड्डान महासंचालक, मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी, एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया, एअर नेव्हिगेशन सर्व्हीस विभागाचे अधिकारी आज दिल्लीत विमान अपघातासंबंधी बैठक घेणार आहेत. राजीव गांधी भवनमध्ये ही बैठक घेण्याचे नियोजित आहे. आम्ही विमान अपघाताचा तपास सुरु केला आहे. एअरक्राफ्ट अॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो((AAIB) चे अधिकारी अपघातस्थळी दाखल झाले आहेत, असे डीजीसीएने सांगितले.