तिरुवअनंतपूरम- निवारागृह संचालिकेच्या पतीने बलात्कार केल्याचा आरोप एका अल्पवयीन मुलीने केला आहे. या प्रकरणी महिलेच्या पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना केरळमधील कोट्टायम जिल्ह्यात ऑक्टोबर 2019 मध्ये घडली होती. मात्र, गुन्हा आता दाखल करण्यात आला आहे.
केरळ: निवारागृहातील अल्पवयीन मुलीवर बलात्कार; संचालिकेच्या पतीवर गुन्हा दाखल - कोट्टायम बलात्कार बातमी
निवारागृहात संचालक म्हणून कार्यरत असलेल्या महिलेचा पती बाबू वर्गीस याने बलात्कार केल्याची तक्रार अल्पवयीन मुलीने केली आहे. ही घटना केरळमधील कोट्टायम जिल्ह्यात ऑक्टोबर 2019 मध्ये घडली. मात्र, गुन्हा आता दाखल करण्यात आला आहे.
![केरळ: निवारागृहातील अल्पवयीन मुलीवर बलात्कार; संचालिकेच्या पतीवर गुन्हा दाखल संग्रहित छायाचित्र](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-05:29:17:1593950357-7897868-minorraped.jpg)
निवारागृहात संचालक म्हणून कार्यरत असलेल्या महिलेचा पती बाबू वर्गीस याने बलात्कार केल्याची तक्रार मुलीने केली आहे. याप्रकरणी पीडित मुलीने निवारागृह ट्रस्ट अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली होती. मात्र, तिचे तोंड बंद करण्यात आले होते. निवारागृह प्रशासनाने मानसिक त्रास दिल्याचा आरोपही मुलीने केला आहे.
ट्रस्टमध्ये तक्रार ऐकून न घेतल्याने पीडितेने बाल कल्याण समितीपुढे तक्रार मांडली. त्यानंतर कोट्टायम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. यावेळी मुलीने पोलिसांना आपबिती सांगितली. घटनेनंतर पीडित मुलीला दुसऱ्या निवारागृहात हलविण्यात आले आहे. या प्रकरणी तपास सुरु आहे. आरोपीला अद्याप अटक करण्यात आली नाही.