तिरुअनंतपुरम- केरळ राज्यातील एर्नाकुलमच्या एका खासगी रुग्णालयात ‘निपा’ विषाणूंबाधित रुग्ण आढळला असल्याची माहिती केरळच्या आरोग्य मंत्री के. के. शैलजा यांनी दिली. रुग्णाची पुणे वायरोलॉजी इन्स्टीट्युटमध्ये तपासणी करण्यात आली, तेव्हा हा रुग्ण निपा विषाणूंबाधित असल्याचे समजले. दरम्यान, के. के. शैलजा यांनी आणखी ८५ जणांना डॉक्टरांच्या निघरानीत ठेवले असल्याचे सांगितले.
केरळात 'निपा' विषाणूबाधीत रुग्ण आढळला; प्रशासनाकडून उपाययोजना सुरू
केरळ राज्यातील एर्नाकुलमच्या एका खासगी रुग्णालयात ‘निपा’ विषाणूंबाधित रुग्ण आढळला असल्याची माहिती केरळच्या आरोग्य मंत्री के. के. शैलजा यांनी दिली. रुग्णाची पुणे वायरोलॉजी इन्स्टीट्युटमध्ये तपासणी करण्यात आली, तेव्हा हा रुग्ण निपा विषाणूंबाधित असल्याचे समजले. केरळ राज्यामध्ये मागील वर्षी मे महिन्यामध्ये शासकीय आकडेवारीनुसार निपा विषाणूमुळे १७ लोकांचा मृत्यू झाला होता.
केरळमध्ये तब्बल ८६ रुग्ण निपा विषाणूग्रस्त असल्याचे सांगण्यात येत होते. तेव्हा आरोग्य मंत्री के. के. शैलजा यांनी याबाबतीत खुलासा केला. त्या म्हणाल्या, सद्य स्थितीमध्ये ८६ रुग्णांना डॉक्टरांच्या निगराणीत ठेवण्यात आले. यातील एका रुग्ण विषाणूबाधित झाला असल्याचा अहवाल पुणे वायरोलॉजी इन्स्टिट्युटने दिला आहे. या परिस्थीतीवर मात करण्यासाठी केरळ सरकार पुर्णपणे तयार असून कोच्ची येथील एर्नाकुलम मेडिकल कॉलेजमध्ये विशेष वार्डाची निर्मीती करण्यात आली असल्याचं त्यांनी सांगितलं.
केरळ राज्यामध्ये मागील वर्षी मे महिन्यामध्ये शासकीय आकडेवारीनुसार निपा विषाणूमुळे १७ लोकांचा मृत्यू झाला होता.