त्रिशूर -रस्त्याच्या दुरवस्थेला आमदार आणि मंत्र्यांना जबाबदार धरून, त्यांच्याविरोधात रस्त्यावर उतरत अर्धनग्न अवस्थेत आंदोेलन करणाऱ्या डॉक्टरला निलंबित करण्यात आले आहे. ही घटना केरळमधील त्रिशूर जिल्ह्यात घडली आहे. कृष्णकुमार असे या डॉक्टरचे नाव आहे. ते मुलांकुन्नथुकाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कार्यरत होते.
मंत्री आणि प्रशासनाच्या विरोधात आंदोलन करणारा डॉक्टर निलंबित - Kerala doctor protested by stripping on road
रस्त्याच्या दुरवस्थेला आमदार आणि मंत्र्यांना जबाबदार धरून, त्यांच्याविरोधात रस्त्यावर उतरत अर्धनग्न अवस्थेत आंदोेलन करणाऱ्या डॉक्टरला निलंबित करण्यात आले आहे. ही घटना केरळमधील त्रिशूर जिल्ह्यात घडली आहे. कृष्णकुमार असे या डॉक्टरचे नाव आहे. ते मुलांकुन्नथुकाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कार्यरत होते.
शहरात रस्त्यांची अवस्था अतिशय खराब झाली आहे. प्रवाशांना त्याचा त्रास होतो. मात्र लोकप्रतिनिधी या रस्त्यांकडे लक्ष देत नाहीत असा आरोप या डॉक्टरांनी कोेला आहे. याचा निषेध करण्यासाठी कृष्णकुमार हे रस्त्यावर उतरले. त्यानंतर त्यांनी हळूहळू आपले सर्व कपडे काढत विचित्र पद्धतीने प्रशासनाचा निषेध केला. दरम्यान हे कपडे आपण लाच स्वरुपात भ्रष्ट अधिकारी आणि लोकप्रतिनिधिंना देणार आहोत असेही ते म्हणाले. या डॉक्टरांच्या आंदोलनाची चांगलीच चर्चा रंगली, त्यानंतर दाखल करण्यात आलेल्या तक्रारीवरून कृष्णकुमार यांचे निलंबन करण्यात आले.