तिरुअनंतपुरम -केरळ सरकारने शुक्रवारी पाच जिल्ह्यांमध्ये सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. बुरेवी चक्रीवादळामुळे राज्यात 'हाय अलर्ट' जारी करण्यात आला असून जसजसे हे वादळ जमिनीच्या दिशेने सरकेल, तेथे जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यामुळे या वादळाच्या टप्प्यात येणाऱ्या पाच जिल्ह्यांमध्ये शुक्रवारी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली असून लोकांना घरातच राहण्याचा सल्ला दिला आहे.
भारत हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) आपल्या ताज्या बुलेटिनमध्ये म्हटले आहे की, बुरेवी 4 डिसेंबरला केरळमध्ये जमिनीकडे सरकेल. यामुळे विभागातर्फे दक्षिण तामिळनाडू आणि दक्षिण केरळच्या भागांत 'रेड अलर्ट' आणि चक्रीवादळाचा इशारा दिला आहे.
हेही वाचा -भुवनेश्वरच्या कान्हूचं मोरांशी आहे अनोखं नातं..!
'हे' आहेत पाच जिल्हे
राज्य सरकारने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्यातील तिरुअनंतपुरम, कोल्लम, पटणमथिट्टा, आलाप्पुझा आणि इडुक्की या जिल्ह्यांसाठी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.