तिरुवनंतपुरम - अमेरिकन कंपनीसोबत राज्यातील कोरोना बाधितांची माहिती शेअर केल्याचा आरोप केरळचे मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांनी फेटाळून लावला आहे. आरोप केल्यानुसार ही पीआर कंपनी नाही. तसेच सेवा दिल्याबद्दल त्यांना पैसे दिले गेले नाहीत. ही एनआरके संचालित कंपनी आहे, जी राज्याला मदत करत आहे, असे विजयन यांनी सांगितले.
विधानसभा विरोधी पक्षनेते रमेश चेन्नीथला यांनी शुक्रवारी डाव्या सरकारवर अमेरिकन कंपनीसोबत राज्यातील कोरोना बाधितांची माहिती शेअर केल्याचा आरोप केला आहे. हा रुग्णांच्या मूलभूत अधिकारांवर झालेला हल्ला असल्याचे त्यांनी म्हटले आहे.