तिरवअनंतपूरम - केरळ राज्यामध्ये आत्तापर्यंत 295 कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आले आहेत. यातील 206 जणांनी परदेशवारी केली असून यातील 7 जण परदेशी नागरिक आहेत. तर 14 रुग्ण पूर्णत: बरे झाले आहेत. या आकडेवारीवरून आम्ही कोरोनाचा प्रसार नियंत्रणात आणला आहे, असे दिसत असल्याचे राज्याचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी म्हटले आहेत.
कोरोना नियंत्रणात आणण्यात आम्हाला यश, केरळच्या मुख्यमंत्र्यांचा दावा - corona spread keral
इतर राज्यामध्ये कोरोनचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत असताना कोरोनाचा प्रसार नियंत्रणात आणल्याचा दावा विजयन यांनी केला आहे.
आज(शुक्रवारी) राज्यामध्ये 9 कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत. 7 जण कसरगोड जिल्ह्यात आणि प्रत्येक एक रुग्ण कन्नूर आणि थिसरूर जिल्ह्यात आढळून आला आहेत. या 9 जणांपैकी 3 जण तबलिगी जमात कार्यक्रमाला गेले होते, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.
इतर राज्यामध्ये कोरोनचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत असताना कोरोनाचा प्रसार नियंत्रणात आणल्याचा दावा विजयन यांनी केला आहे. भारतामध्ये आत्तापर्यंत 2 हजार 301 कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आले आहेत. 157 जण पूर्णत बरे झाले असून 56 जणांचा मृत्यू झाला आहे. दिल्लीतील तबलिगी जमात कार्यक्रमाला हजेरी लावलेल्या नागरिकांमुळे भारतात कोरोनाग्रस्तांचा आकडा वरती गेला आहे.