महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

लॉकडाऊनमध्ये पार पडले केरळच्या मुख्यमंत्र्यांच्या मुलीचे लग्न - Veena weds Mohammed Riyas

केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्या मुलीचे लग्न आज सकाळी 11 वाजता पार पडले आहे. विजयन यांच्या मुलीचे नाव वीणा असून त्यांचे लग्न मोहम्मद रियाझ यांच्याशी झाले.

केरळच्या मुख्यमंत्र्यांच्या मुलीचे लग्न
केरळच्या मुख्यमंत्र्यांच्या मुलीचे लग्न

By

Published : Jun 15, 2020, 5:23 PM IST

तिरुवनंतपूरम - केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्या मुलीचे लग्न आज सकाळी 11 वाजता पार पडले आहे. विजयन यांच्या मुलीचे नाव वीणा असून त्यांचे लग्न मोहम्मद रियाझ यांच्याशी झाले. मोहम्मद हे डेमोक्रॅटीक फेडरेशन ऑफ इंडिया म्हणजेच डीएफआयच्या युवा मोर्चाचे अध्यक्ष आहे. वीणा यांची बंगळुरु इथे स्वत:ची कंपनी असून त्या सॉफ्टवेअर इंजिनिअर आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साध्या पद्धतीने मुख्यमंत्र्यांच्या अधिकृत निवासस्थानावरील क्लिफ हाऊस येथे लग्न झाले. जवळचे मित्र आणि नातेवाईक यांच्यासह सुमारे 50 लोक उपस्थित होते. कुटुंबीयांव्यतिरिक्त उद्योगमंत्री ईपी जयराजन, सीपीएम सदस्य के. क्रिश्नन नायर तसेच DYFI चे नेते साजिश उपस्थित होते.

विशेष विवाह कायद्यांतर्गत विवाह नोंदवण्यात आला आहे. मोहम्मद रियाझ यांचा जन्म कालिकतमध्ये झाला असून त्यांचे वडील पीएम अब्दुल कादर हे एक सनदी अधिकारी होते. वीणा आणि रियाज दोघांचेही आधी घटस्फोट झाले असून वीणाला एक मुलगा आहे तर, रियाज यांना देखील पहिल्या पत्नीपासून दोन मुले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details