महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

'जय भीम' योजनेच्या माध्यमातून गरीब विद्यार्थ्यांनी घेतली भरारी - jai bhim scheme

'जय भीम मुख्यमंत्री प्रतिभा' या योजने अंतर्गत 107 अभियांत्रिकी आणि वैद्यकीय परिक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना आर्थिक मदत देण्यात आली आहे.

'जय भीम' योजनेच्या माध्यामातून गरीब विद्यार्थ्यांनी घेतली भरारी

By

Published : Jul 29, 2019, 11:44 PM IST

Updated : Jul 29, 2019, 11:58 PM IST

नवी दिल्ली -'जय भीम मुख्यमंत्री प्रतिभा' या योजने अंतर्गत 107 अभियांत्रिकी आणि वैद्यकीय परिक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना आर्थिक मदत देण्यात आली आहे. यामधील एक तृतीयांश मुलांनी अभियांत्रिकी आणि वैद्यकीय स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण केल्याची माहिती समाज कल्याण मंत्री राजेंद्र पाल गौतम यांनी दिली.

'जय भीम' योजनेच्या माध्यामातून गरीब विद्यार्थ्यांनी घेतली भरारी


सरकारी शाळेमध्ये शिक्षण घेणारे आणि आर्थिक परिस्थितीने मागास असलेले विद्यार्थी वैद्यकीय, अभियांत्रिकी आणि अन्य स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करू शकत नाहीत. अशा विद्यार्थ्यांसाठी केजरीवाल सरकारने गेल्या वर्षी जय भीम मुख्यमंत्री प्रतिभा या योजनेची सुरुवात केली होती.


या योजनेअंतर्गत 107 अभियांत्रिकी आणि वैद्यकीय परिक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना आर्थिक मदत देण्यात आली आहे. यामधील एक तृतीयांश मुलांनी अभियांत्रिकी आणि वैद्यकीय स्पर्धापरीक्षा उर्त्तीण केल्याची माहिती समाज कल्याण मंत्री राजेंद्र पाल गौतम यांनी दिली.


सरकारने शिकवणी संस्थामध्ये प्रत्येकी 40 हजार रुपये शुल्क भरले आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना 4 महिन्याची शिकवणी देण्यात आली. या शिकवणीमुळे काही विद्यार्थ्यांना आयआयटीमध्ये प्रवेश मिळाला असून त्यांनी या योजनेचे आभार मानले आहेत.


'40 हजार रुपये ही रक्कम कमी असून ती वाढवण्याचा सरकारचा विचार आहे. सध्या 8 संस्थामध्ये शिकवणी सुरू आहे. मात्र, भविष्यात जास्त संस्थाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येईल, असे समाज कल्याण मंत्री राजेंद्र पाल गौतम यांनी सांगितले.


'जय भीम मुख्यमंत्री प्रतिभा' ही योजना दिल्लीमधील 12 वी ची परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आहे. या योजनेचा लाभ 75 टक्के सरकारी शाळेमध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलांना घेता येतो. तर 25 टक्के लाभ पब्लिक शाळेमध्ये शिक्षण घेणाऱया विद्यार्थ्यांना घेता येतो.

Last Updated : Jul 29, 2019, 11:58 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details