हैदराबाद -साधारणपणे दोन महिन्यांपासून सुरू असलेला तेलंगणा राज्य रस्ते वाहतूक कर्मचाऱ्यांचा संप मागे घेण्यात आला होता. त्यानंतर काल (गुरुवार) तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी सर्व कर्मचाऱ्यांना शुक्रवारपासून कामावर रूजू होण्यास सांगितले. काल एक विशेष पत्रकार परिषद घेऊन त्यांनी ही माहिती दिली.
यामध्ये त्यांनी कर्मचाऱ्यांना कामावर रूजू होण्यास सांगितले. तसेच, 'टीएसआरटीसी'ला आर्थिक संकटांमधून बाहेर काढण्यासाठी काही उपाय योजनाही जाहीर केल्या.
या केल्या घोषणा -
- सर्व कर्मचाऱ्यांना कोणत्याही अटींशिवाय कामावर रूजू करून घेण्यात येईल.
- तत्काळ मदत निधी म्हणून सरकारकडून १०० कोटी रुपये देणार.
- पुढील सोमवारपासून 'टीएसआरटीसी';च्या तिकिटांमध्ये २० पैसे प्रतिकिलोमीटर दरवाढ करण्यास मंजूरी.
- आंदोलनादरम्यान आपला जीव गमावलेल्या लोकांच्या कुटुंबीयांना सरकारी नोकरी देण्यात येईल.
- सरकारमार्फत कर्मचारी कल्याण परिषदेची स्थापना करण्यात येईल.