महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

कोरोना : तेलंगाना राज्यातील लॉकडाऊन 29 मेपर्यंत वाढवला - extends lockdown in Telangana to May 29

तेलंगाना राज्यातील लॉकडाऊन 29 मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. तेलंगानाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

तेलंगाना
तेलंगाना

By

Published : May 5, 2020, 11:41 PM IST

हैदराबाद- कोरोनाचा प्रसार अद्याप थांबलेला नसल्याने तेलंगाना राज्यातील लॉकडाऊन 29 मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. तेलंगानाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

सायंकाळी 6 वाजेपर्यंत नागरिकांनी जीवनावश्यक वस्तूंची खरेदी पूर्ण करावी आणि आपापल्या घरी पोहचावे. सायंकाळी सात वाजल्यापासून राज्यात कर्फ्यू लागू असेल. बाहेर कोणीही आढळल्यास त्यांच्यावर पोलीस कारवाई करतील, असे तेलंगानाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव म्हणाले.

3 मे रोजी केंद्राकडून लागू असलेला लॉकडाऊन संपण्यापूर्वी त्यांनी राज्यात 7 मेपर्यंत लॉकडाऊन लागू ठेवणार असल्याचे या अगोदर सांगितले होते. 7 तारखेच्या अगोदरच दोन दिवस त्यांनी लॉकडाऊन अजून 29 मे पर्यंत वाढवणार असल्याचे जाहीर केले आहे. राज्यातील नागरिकांना त्यांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. 65 वयाच्या वरच्या आणि लहान मुलांची विशेष खबरदारी घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details