हैदराबाद- तेलंगणा सरकारने गुरुवारी सरकारच्या अखत्यारीत असलेल्या सिंगरेनी कोलरीज कंपनीच्या कर्मचाऱ्यांना खुशखबर दिली. २०१८- २०१९ वर्षासाठी सरकारने या कंपनीच्या ४८ हजार कर्मचाऱ्यांना प्रत्येकी १ लाख रुपये बोनस देण्याची घोषणा केली आहे. तेलंगाणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी याबाबतची घोषणा राज्याच्या विधानसभेत केली.
तेलंगाणा सरकारने 'या' कर्मचाऱ्यांना दिला प्रत्येकी 1 लाख रुपये बोनस - SCCL bonus
२०१८- २०१९ वर्षासाठी तेलंगणा सरकारने सिंगरेनी कोलरीज कंपनीच्या ४८ हजार कर्मचाऱ्यांना प्रत्येकी १ लाख रुपये बोनस देण्याची घोषणा केली आहे.
के. चंद्रशेखर राव
मागील वर्षीपेक्षा बोनसची रक्कम ४० हजार रुपयांनी जास्त आहे. दसरा सणाच्या निमित्ताने सरकारने मोठा बोनस देवून कर्मचाऱ्यांना खूश केले आहे. कंपनीचा बाजारभाव वधारला असल्याने हा निर्णय घेण्यात आला.
यावर्षी कंपनीच्या नफ्यात १ टक्क्याने वाढ होवून २८ टक्के नफा झाला आहे. त्यामुळे प्रत्येक कर्मचाऱ्याला १ लाख बोनस मिळणार आहे, असे के. सी राव यांनी विधानसभेमध्ये सांगितले.