नवी दिल्ली - पुलवामा घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी काश्मिरमधील स्थानिक लोकांनी आज निदर्शने केली. यावेळी लोकांनी पाकिस्तान आणि काश्मिरी हुर्रियतच्या नेत्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. दहशतवाद संपवायचा असेल, तर फुटीरतवादी नेत्यांना गोळ्या घालायला हव्यात, अशा संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केल्या.
देशद्रोही नेत्यांना गोळी घाला, फुटीरतावादी नेत्यांविरोधात काश्मिरी नागरिकांचा संताप
पाकिस्तानच्या आधी काश्मिरमधील हुर्रियत नेत्यांवर कारवाई करण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे.
दहशतवादी कारवायांसाठी पाकिस्तान जेवढे जबाबदार आहेत, त्याहूनही जास्त काश्मिरचे हुर्रियतचे नेते जबाबदार आहेत. ते काश्मिरी तरुणांची दिशाभूल करतात. त्यामुळे पाकिस्तानच्या आधी हुर्रियतच्या नेत्यांवर कारवाई व्हायला हवी, असे मत स्थानिक नागरिकांनी व्यक्त केले.
आपला संताप नागरिकांनी घोषणांच्या माध्यमातून व्यक्त केला. हुर्रियतच्या नेत्यांना सरळ गोळी मारली पाहिजे. सगळ्यात आधी काश्मिरी नेता मीर वाईज अली शाह गिलानी यांना गोळी मारा, अशी मागणी काही नागरिक करत आहेत. यावेळी लोकांनी फारुख अब्दुल्ला, उमर अब्दुल्ला आणि मेहबुबा मुफ्ती यांच्यावरही निशाणा साधला. हल्ले फक्त जवानांवरच का होतात, या नेत्यांवर का होत नाहीत? असाही प्रश्न त्यांनी विचारला.