श्रीनगर - 'अशुरा' म्हणजेच मोहरम सणाचा दहावा दिवस जवळ आला आहे. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जम्मू काश्मीरात धार्मिक कार्यक्रम साजरा करण्यास बंदी घालण्यात आली आहे. दरम्यान, काश्मीरातील गायक झिशान जयपुरी हा 'मरसीया' आणि 'नोहा' या करबाला युद्धावरील कविता लिहण्यात व्यग्र आहे. दरवर्षी नव्या पद्धतीनं अनेक कवी नोहा आणि मरसीया लिहत असतात.
काश्मिरात कोरोनामुळे मोहरम सणावर निर्बंध....मात्र, झिशान 'नोहा' लिहण्यात दंग
मुस्लीम धर्माचे प्रेषित मोहम्मद यांचा नातू हुसैन ईब्न अली आणि युमायद खलिफा याझदी पहिला यांच्यात करबालाचे युद्ध झाले होते. या युद्धात हुसैन ईब्न अली शहीद झाले होते. त्यांच्या मृत्यूनंतर नोहा आणि मरसिया कवितेद्वारे शोक व्यक्त केला जातो.
मुस्लिम धर्माचे प्रेषित मोहम्मद यांचा नातू हुसैन ईब्न अली आणि युमायद खलिफा याझदी पहिला यांच्यात करबालाचे युद्ध झाले होते. या युद्धात हुसैन ईब्न अली शहीद झाले होते. त्यांच्या मृत्यूनंतर नोहा आणि मरसिया कवितांतून शोक व्यक्त केला जातो. शिया धर्मीयांमध्ये या परंपरेस अत्यंत महत्त्व आहे. नोहा ही दुख: व्यक्त करण्याची कविता आहे. तसेच शिया धर्मियांच्या साहित्याचा हा मुख्य भाग आहे.
नोहा किंवा मरसिया पर्शियन आणि उर्दुसह विविध भाषांमध्ये लिहल्या जातात. या कविता लिहताना फक्त यमक जुळविण्याचा प्रयत्न केला जातो, त्यामुळे लिहण्यासाठी कोणताही दुसरा नियम नाही, असे २५ वर्षीय झिशानने सांगितले. नोहा कविता मरसियाच्या तुलनेत कमी प्रमाणात लिहल्या गेल्या असून त्याकडे दुर्लक्ष झाल्याचे त्याने सांगितले. दरवर्षी करबाला युद्ध किंवा इतर कोणत्याही विषयावर नव्या पद्धतीने कविता करण्यात येतात, हे या लिखाणाचे सौंदर्य आहे. ईटीव्ही भारतने या विषयी झिशानशी चर्चा करुन त्याच्या लिखाणाबद्दल जाणून घेतले आहे.