महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

तुरुंगात असलेल्या काश्मीरी पत्रकाराला अमेरिकेचा 'पत्रकारिता स्वातंत्र्य पुरस्कार'

काश्मीरमधील असीफ सुलतान या पत्रकाराला अमेरिकेचा 'पत्रकारिता स्वातंत्र्य पुरस्कार' जाहीर झाला आहे.

पत्रकारिता स्वातंत्र्य पुरस्कार'

By

Published : Aug 26, 2019, 8:02 PM IST

श्रीनगर - काश्मीरमधील असीफ सुलतान या पत्रकाराला अमेरिकेचा 'पत्रकारिता स्वातंत्र्य पुरस्कार' जाहीर झाला आहे. जॉन ऑबुचॉन हा पुरस्कार नॅशनल प्रेस कल्बकडून देण्यात आला आहे.


माझ्या मुलाला पुरस्कार मिळाला असल्याचं मला त्याच्या मित्राकडून कळाले आहे. बरेच पत्रकार आज आमच्या घरी आले आणि त्यांनी मला ही माहिती दिली. ही आमच्यासाठी गौरवाची बाब आहे, असे असिफचे वडिल सुलतान मोहम्मद यांनी म्हटले आहे.


काश्मीरमध्ये महिण्याला निघणाऱया काश्मीर नॅरटर या मासीकामध्ये असीफ काम करत होता. गेल्या वर्षी जुलैमध्ये ठार हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर बुरहान वानी याच्याबद्दल त्याने कव्हर स्टोरी लिहिली होती, ज्याच्या मृत्यूमुळे काश्मीरमध्ये अनेक महिने निदर्शने झाली होती.


नंतर त्याला दहशतवादी गटांशी संबंध असल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. गेल्या एका वर्षापासून तो तुरुंगामध्ये आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details