अहमदाबाद - जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 हटवण्यात आल्याने राजकीय वातावरण तापले आहे. मात्र, जम्मू काश्मीरच्या रहिवाशी असणाऱ्या पण सध्या सुरत नर्सिंग रुग्णालयात शिकणाऱ्या मुलींनी आपल्या कृतीतून बंधूभावाचा संदेश दिला आहे. या शिकावू मुलींनी रुग्णांना राखी बांधत केंद्र सरकाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.
काश्मीरी मुलींनी रुग्णांना बांधली राखी; दिला बंधूभावाचा संदेश - surat civil hospital patient
जम्मू काश्मीरच्या रहिवाशी असणाऱ्या पण सध्या सुरत नर्सिंग रुग्णालयात शिकणाऱ्या मुलींनी आपल्या कृतीतून बंधूभावाचा संदेश दिला आहे. या शिकावू मुलींनी रुग्णालयातील रुग्णांना राखी बांधत केंद्र सरकाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.
इतके दिवस जम्मू-काश्मीरमधील जनतेचा संबंध देशातील लोकांशी येत नव्हता. मात्र, आता हा संबंध अधिक दृढ होईल. भारताशी पूर्णपणे जोडले गेल्याने आता जम्मू-काश्मीरमध्ये विकासाला चालना मिळेल. त्यामुळे येथील रुग्णांना राखी बांधून आम्ही बंधूभावाचा संदेश देत आहोत, अशी प्रतिक्रिया जम्मू काश्मीरमधून आलेल्या समिना फय्याज हीने दिली.
स्वाती शर्मा या विद्यार्थिनीनेही सरकारने घेतलेल्या निर्णयाचे स्वागत केले. जम्मू-काश्मीर इतके दिवस इतर राज्यांपासून वेगळे पडत होते. मात्र, आता संपूर्ण भारतासोबत जम्मू-काश्मीरचे संबंध प्रस्थापीत होतील. जम्मू-काश्मीरच्या जनतेलाही मुख्य प्रवाहात यायचे होते. येथील रुग्णांना आणि आमच्या शिक्षकांना राखी बांधत आम्ही हाच संदेश देत आहोत, असे ती म्हणाली.