महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

मातीच्या भांड्यांनी दिली 'या' महिला इंजिनीअरला ओळख, सोशल मीडियावरही कौतुक

सायमा यांनी सांगितले की, ही भांडी खूप महाग होती. म्हणून त्यांनी फक्त एक भांडे विकत घेतले. त्याच वेळी, सायमा यांच्या मनात काश्मीरच्या क्राल समुदायाचा विचार आला. हा समुदाय हजारो वर्षांपासून मातीची भांडी बनवत आहे. परंतु त्यांची कला आधुनिकतेच्या युगात नष्ट झाली आहे. काश्मीरला परतल्यानंतर हा विचार मनात आल्यानंतर सायमा बंगळुरुला गेल्या आणि त्यांनी आधुनिक पद्धतीने कुंभारकाम करण्याचे प्रशिक्षण घेतले. आता काश्मीरमध्ये त्या क्राल समुदायाला विनामूल्य ही कला शिकवत आहेत.

काश्मीरी महिला इंजिनीअर न्यूज
काश्मीरी महिला इंजिनीअर न्यूज

By

Published : Oct 21, 2020, 6:23 PM IST

श्रीनगर - जम्मू-काश्मीरच्या श्रीनगर येथील रहिवासी सायमा शफी या पेशाने सरकारी कनिष्ठ अभियंता (जेई) आहेत. काही वर्षांपूर्वी त्या आपल्या परिवारासह चंदीगडला गेल्या होत्या. तेथे त्यांना एका ब्रँडेड शोरूममध्ये हजारो रुपये किमतीची मातीची सुंदर भांडी दिसली. ती मातीची भांडी सायमा यांना इतकी आवडली की, अशा भांड्यांच्या संकलनाचा त्यांना छंदच जडला.

सायमा यांनी सांगितले की, ही भांडी खूप महाग होती. म्हणून त्यांनी फक्त एक भांडे विकत घेतले. त्याच वेळी, सायमा यांच्या मनात काश्मीरच्या क्राल समुदायाचा विचार आला. हा समुदाय हजारो वर्षांपासून मातीची भांडी बनवत आहे. परंतु त्यांची कला आधुनिकतेच्या युगात नष्ट झाली आहे. काश्मीरला परतल्यानंतर हा विचार मनात आल्यानंतर सायमा बंगळुरुला गेल्या आणि त्यांनी आधुनिक पद्धतीने कुंभारकाम करण्याचे प्रशिक्षण घेतले. आता काश्मीरमध्ये त्या क्राल समुदायाला विनामूल्य ही कला शिकवत आहेत. आत्तापर्यंत त्यांनी तीनशेहून अधिक लोकांनी ही कला शिकवली आहे.

मातीच्या भांड्यांनी दिली 'या' महिला इंजिनीअरला ओळख, सोशल मीडियावरही कौतुक

सोशल नेटवर्किंग साइट्सवर खूप कौतुक

जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे आर्टिकल 370 रद्द संपुष्टात येण्यापूर्वी सुमारे आठवडाभर आधी आपले काम सुरू केल्याचे सायमा यांनी सांगितले. यानंतर सोशल नेटवर्किंग साइट्सवर त्यांचे खूप कौतुक केले गेले. परंतु, केंद्र सरकारने या प्रदेशात लागू केलेल्या निर्बंधांमुळे त्यांना नंतर अनेक अडचणींचा सामना करावा लागला.

कोविड - 19 मुळे अडचणी

या निर्बंधातही काही सवलती देण्यात आल्या. पण त्यानंतर हिवाळा आला होता. हिवाळ्यामध्ये मातीच्या भांड्यांचा उपयोग केला जात नाही. त्यानंतर वसंत ऋतूच्या आगमनानंतर त्यांचे कार्य पुन्हा सुरु होईल, अशी आशा सायमा यांना होती. परंतु, जगभरात कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे भीतीचे वातावरण होते आणि त्यानंतर लॉकडाऊनमध्ये मातीच्या भांड्यांची विक्री थांबल्यामुळे त्यांच्या आशा मावळल्या.

पालकांच्या पाठिंब्याने पुढे गेले

जेव्हा मी माझे काम सुरू केले, तेव्हा मला सर्व बाजूंनी प्रोत्साहन मिळत होते. मी माझ्या पालकांना हे काम चांगल्या प्रकारे करू शकेन अशी खात्री दिली होती. ते मला प्रोत्साहन देत होते. काश्मीरमध्ये मातीची भांडी उपलब्ध नाहीत. मातीपासून मशीनपर्यंत सर्व काही आयात करावे लागत आहे, असे सायमा म्हणाल्या.

आशेमधून मिळतोय उत्साह

येथे टेराकोटा माती वापरली जाते. ही आधुनिक कुंभारामध्ये वापरली जात नाही. म्हणून मी काही वस्तू बाहेरून मागवल्या आहेत. परंतु, माझ्या वस्तू मला कधी मिळतील, याचा शोध घेण्याचे साधन माझ्याकडे नव्हते. मग मला मालाची माहिती मिळवण्यासाठी दिल्लीला जावे लागले. मग अशी अपेक्षा होती की, पुढच्या वर्षी सर्व काही ठीक होईल. परंतु, हे काश्मीर आहे. येथे कधीही काहीही घडू शकते.

ABOUT THE AUTHOR

...view details