वाराणसी (उत्तर प्रदेश) - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या काशी विश्वनाथ कॉरिडोर परियोजनेचे काम पुन्हा एकदा सुरू करण्यात आले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे कॉरिडोरचे काम बंद ठेवले होते. गुरुवारी सरकारकडून काम करण्यास परवानगी मिळाल्यानंतर सोशल डिस्टन्स राखत काम सुरू करण्यात आले आहे. कामाच्या ठिकाणी कर्मचारी वगळता कुणालाही जाण्याची परवानगी नाही.
काम सुरू करण्यापूर्वी वरिष्ठ कर्मचारी आणि कामगारांचे थर्मल स्क्रिनिंग करण्यात आले. सुरक्षित अंतर राखूनच काम करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दररोज काम सुरू करताना आणि बंद करताना सॅनिटायझरचा उपयोग केला जात आहे. सर्व कामगार, कर्मचारी यांना मास्क, हातमोजे आणि इतर सुरक्षा साहित्य पुरवण्यात आले आहे. तरीही कोणाचे आरोग्य बिघडल्यास तत्काळ वरिष्ठांना माहिती देण्यास सांगण्यात आले आहे.