महाराष्ट्र

maharashtra

कार्तिकी पौर्णिमेनिमित्त वाराणसीत भाविकांची गर्दी, गंगेत स्नान करण्यासाठी भाविक आतूर

By

Published : Nov 12, 2019, 2:16 PM IST

कार्तिक पौर्णिमेनिमित्त वाराणसीत देशभरातून भाविकांनी गर्दी केली आहे. गंगा नदीमध्ये स्नान करुन पुण्य मिळवण्यासाठी भाविकांची गर्दी ओसंडून वाहत आहे.

वाराणसीत भाविकांची गर्दी

लखनऊ- कार्तिक पौर्णिमेनिमित्त वाराणसीत देशभरातील भाविकांनी गर्दी केली आहे. गंगा नदीमध्ये स्नान करुन पुण्य मिळवण्यासाठी भाविकांची गर्दी ओसंडून वाहत आहे. गंगा नदीवरील अनेक घाटांवर मोठ्या संख्येने भाविक जमले आहेत. सोमवारी रात्री उशिराच भाविक वाराणसीत दाखल होण्यास सुरूवात झाली आहे.

कार्तिकी पौर्णिमेनिमित्त वाराणसीत भाविकांची गर्दी
कार्तिक पौर्णिमेदिवशी गंगा नदीमध्ये स्नान करत मोक्ष मिळण्यासाठी भाविकांनी देवाला प्रार्थना केली. कार्तिक पौर्णिमेनिमित्त गंगा नदीकाठी हजारो दिवे लखलखताना दिसतात. सकाळी भाविक गंगा नदीमध्ये स्नान करतात. तर रात्री गंगा नदी घाट दिव्यांनी उजळून निघतात. पोलिसांनी वेगवेगळ्या घाटांवर कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवली आहे. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी चार्तूरमाचाही सांगता होते.कार्तिक पौर्णिमेचे अध्यात्मिक महत्त्वपुराणातील कहानीनुसार आजच्या दिवशी भगवान शंकराने त्रिपुरासुर या दैत्याचा वध केला होता. त्यामुळे देवांनी काशीत येऊन नदीकाठी दिवे लावून भगवान शंकराचे स्वागत करण्यात आले होते. तसेच राक्षसाच्या वध झाल्यामुळे आनंद साजरा करत देव दिपावली साजरी केली होती. ती पंरपरा भाविकांनी आजही सुरु ठेवल्याची ही कथा आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details