महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

ईडी समोर हजर झाले कार्ती चिदंबरम, म्हणाले... 'आधिकाऱ्यांना विजयादशमीच्या शुभेच्छा देण्यासाठी आलो' - Karti Chidambaram Enforcement Directorate

कार्ती चिदंबरम आयएनएक्स मीडिया गैरव्यवहार प्रकरणी आज अंमलबजावणी संचालनालय (ईडी) हजर झाले होते.

कार्ती चिदंबरम,

By

Published : Oct 9, 2019, 3:06 PM IST

नवी दिल्ली -माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांचे पूत्र कार्ती चिदंबरम आयएनएक्स मीडिया गैरव्यवहार प्रकरणी आज अंमलबजावणी संचालनालयाच्या कार्यालयात (ईडी) हजर झाले होते. यावेळी माध्यमांनी प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी मजेशीर उत्तर दिले आहे.


चौकशी सदंर्भात पत्रकारांनी प्रश्न विचारल्यानंतर कार्ती यांनी 'मी फक्त दसऱ्यानिम्मित्त ईडीच्या आधिकाऱ्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलो आहे', असे उत्तर माध्यमांना दिले. आयएनएक्स मीडिया गैरव्यवहार प्रकरणी कार्ती चिदंबरम जामीनावर बाहेर आहेत. तर पी. चिदंबरम आयएनएक्स मीडिया गैरव्यवहार प्रकरणात न्यायालयीन कोठडीत आहेत. केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) चिदंबरम यांना २१ ऑगस्टला अटक केली होती. त्यांच्या न्यायालयीन कोठडीत १७ ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे.


कार्ती चिदंबरम यांच्यावरील आरोप -
आयएनएक्स मीडियाला विदेशी फंड आल्यानंतर अर्थमंत्रालयाकडून मंजुरी दिली, जेव्हा की 'फॉरेन इन्व्हेस्टमेंट प्रमोशन बोर्डाला' (एफआयपीबी) विदेशी फंड मिळण्यापूर्वीच अनुमती देणे गरजेचे होते. बोर्डाने ही परवानगी ४.६२ कोटी रुपयांसाठी दिली होती. यानंतरही २००७ मध्ये ३०५ कोटी रुपये अवैधरित्या आले. मॉरिशसच्या गुंतवणूकदारांचा पैसा आल्यानंतर पीटर मुखर्जीने कार्तीशी संपर्क केला. यानंतर अर्थ मंत्रालयाकडून मंजुरी मिळाली. हा पैसा कार्तींशी संलग्न असलेल्या कंपन्यांकडे गेला होता, असे तपास संस्थांचे म्हणणे आहे. यातील ५ कोटी रुपयांची माहिती मिळाली असल्याचा दावा करण्यात आला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details