महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

कोरोना लस घेतल्यानंतर कर्मचाऱ्याचा मृत्यू, आरोग्य मंत्रालयाने दिलं स्पष्टीकरण

मृत कोरोना योद्धा बेलारी जिल्ह्यातील कमलापूरा गावातील रहिवासी होता. तसेच तो संदूर येथील सरकारी रुग्णालयात काम करत होते. सोमवारी सकाळी कामावर जाण्याची तयारी करत असताना त्यांच्या अचानक छातीत वेदना होऊ लागल्या.

By

Published : Jan 19, 2021, 12:57 PM IST

आरोग्य मंत्री के. सुधाकर
आरोग्य मंत्री के. सुधाकर

बंगळुरू - कोरोना लस घेतल्यानंतर कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना कर्नाटकातील बेलारी जिल्ह्यात घडली आहे. मृत्यू झालेला व्यक्ती सुंदूर येथील सरकारी रुग्णालयात चर्तुथ श्रेणी कर्मचारी होता. लस घेतल्यानंतर या कर्मचाऱ्याला दोन दिवस कोणताही त्रास झाला नव्हता. मात्र, त्यानंतर हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.

आरोग्य मंत्रालयाने दिलं स्पष्टीकरण -

'४३ वर्षीय आरोग्य कर्मचाऱ्याचा मृत्यू लसीचा डोस घेतल्यामुळे नाही तर हृदयविकाराच्या झटक्यामुळे मृत्यू झाला. मायोकॉर्डिअल इनफ्रॅक्शनमुळे हृद्यविकाराचा झटका आल्याचे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. शनिवारी १६ जानेवारीला या कर्मचाऱ्याने लस घेतली होती. मात्र, त्यानंतर कोणतेही दुष्परिणाम जाणवले नव्हते. तणाव आणि मधुमेह आजाराच्या व्याधींनी हा कर्मचारी ग्रस्त होता, असे आरोग्य मंत्री के. सुधाकर यांनी जारी केलेल्या अधिकृत वक्तव्यात म्हटले आहे.

छातीत वेदना होऊ लागल्याने रुग्णालयात दाखल -

कर्नाटकची राजधानी बंगळुरूपासून बेलारी जिल्हा सुमारे ३१० कि.मी आहे. मृत कोरोना योद्धा जिल्ह्यातील कमलापूरा गावातील रहिवासी होता. तसेच संदूर येथील सरकारी रुग्णालयात काम करत होता. सोमवारी सकाळी कामावर जाण्याची तयारी करत असताना त्यांच्या अचानक छातीत वेदना होऊ लागल्या. त्यानंतर संजीवनी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. बेलारी येथील विम्स रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. मृत्यू झाल्यानंतर डॉक्टरांनी कर्मचाऱ्याचे सर्व अहवाल तपासले. त्यात हृदयविकाराने मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. कोरोना लस दिल्याने मृत्यू झाला नसल्याचे स्पष्ट केले आहे.

उत्तर प्रदेशातही कर्मचाऱ्याचा मृत्यू

कोरोना लस घेतल्यानंतर उत्तर प्रदेशातील मुरादाबाद जिल्ह्यातही एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. या व्यक्तीचाही हृदविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे डॉक्टरांच्या पथकाने सांगितले आहे. कोरोना लस घेतल्यानंतर अद्याप देशात दोन जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. मात्र, याचा लसीकरणाशी संबध नसल्याचे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details