बंगळुरू : कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा यांनी सोमवारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. ठाकरेंनी रविवारी कर्नाटकव्याप्त मराठी भाग महाराष्ट्रात आणून दाखवू असे वक्तव्य केले होते. याबाबत बोलताना येडीयुरप्पा म्हणाले, की ठाकरेंचे हे वक्तव्य देशाच्या तत्त्वांविरुद्ध आहेत.
"महाराष्ट्रात मराठी भाषा आणि संस्कृती एकत्रित करण्याबाबतचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे वक्तव्य अस्पष्ट आहे. हे भारतीय संघाच्या तत्वांच्या विरोधात आहे. याबाबत महाजन अहवालच अंतिम आणि सत्य आहे" असे मत येडीयुरप्पांनी व्यक्त केले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शांततापूर्ण वातावरणाला बिघडवण्याचे काम करत आहेत, हे अतिशय दुर्देवी आहे असेही ते म्हणाले.
प्रादेशिकता आणि भाषाविवादाची चर्चा ही देशाच्या ऐक्यासाठी हानीकारक आहे, त्यामुळे मी याचा निषेध करतो. कर्नाटकमध्ये मराठी लोक हे कन्नडभाषिक लोकांसोबत राहत आहेत, त्याचप्रमाणे कित्येक कन्नडभाषिक लोकही महाराष्ट्रात मराठी लोकांसोबत राहत आहेत, असे येडीयुरप्पा म्हणाले.
काय म्हणाले होते ठाकरे?
हुतात्मा दिनानिमित्त रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्नाटक-महाराष्ट्र सीमा लढ्यातील हुतात्म्यांना विनम्र अभिवादन केले. कर्नाटक व्याप्त प्रदेश महाराष्ट्रात आणण्यासाठी कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चारही मुख्यमंत्र्यांनी आपल्या अभिवादनात केला. तर, कर्नाटक सीमा भागातलं शेवटचं मराठी गाव महाराष्ट्रात येईपर्यंत सर्वशक्तीनिशी व निर्धारानं लढत रहाणं हीच हुतात्म्यांना श्रद्धांजली असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी म्हणाले.
मुख्यमंत्र्यांकडून असे विधान बरोबर नाही - शिवकुमार