बंगळुरु -कर्नाटकात नाट्यमय राजकीय घडामोडींनंतर काँग्रेस पक्षातर्फे कर्नाटकातील प्रभारी के. सी. वेणुगोपाल यांना या परिस्थितीची माहिती घेण्यासाठी तातडीने बंगळुरु येथे धाडले आहे. 'हा सर्व प्रकार म्हणजे 'ऑपरेशन कमळ' असून भाजपनेच कर्नाटक आघाडी सरकार पाडण्याचा केलेला डाव आहे. भाजपला कर्नाटकात स्वतःचे सरकार आणायचे आहे,' असे काँग्रेसचे म्हणणे आहे.
नाट्यमय राजकीय घडामोडींनतर काँग्रेसच्या महत्त्वाच्या नेत्यांची बैठक
वेणुगापोल, माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, कर्नाटक प्रदेश काँग्रेस कार्यकारी अध्यक्ष ईश्वर खांद्रे, मंत्री डी. के. शिवकुमार, डी. के. सुरेश आणि इतर काही नेत्यांची चर्चा सुरू आहे.
वेणुगापोल, माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, कर्नाटक प्रदेश काँग्रेस कार्यकारी अध्यक्ष ईश्वर खांद्रे, मंत्री डी. के. शिवकुमार, डी. के. सुरेश आणि इतर काही नेत्यांची चर्चा सुरू आहे.
काँग्रेस-जेडीएसचे १० बंडखोर आमदार मुंबईत दाखल
राजीनामा दिलेले काँग्रेस-जेडीएसचे १० आमदार मुंबईत दाखल झाल्याचे वृत्त आले आहे. आज रात्री ८.१५ वाजण्याच्या सुमारास मुंबईत दाखल झाले आहेत. त्यांच्यासाठी रेनाईसान्स हॉटेलमध्ये १४ रूम्स बुक करण्यात आल्या आहेत. आमदार रामलिंग रेड्डी, कर्नाटकात सिद्धरामय्यांना मुख्यमंत्री करण्याची मागणी करणारे २ आमदार एस. टी. सोमशेखर आणि मुनिरत्न यांचा या १० जणांमध्ये समावेश नाही.
याआधी राजीनामा दिलेले आमदार खास विमानाने गोव्याला रवाना झाले, अशी माहिती बी. सी. पाटील यांनी दिली होती. पाटील यांनीही आज राजीनामा दिलीा होता. हे सर्व आमदार हिंदुस्थान एरॉनॉटिक्स लिमिटेडच्या विमानतळावर आले आणि खास विमानाने तेथून गोव्याला रवाना झाले, असे त्यांनी सांगितले होते.