बंगळुरू - आज देशातील ग्रीन आणि ऑरेंज जिल्ह्यांमध्ये दारुची दुकाने सुरू झाली आहेत. कर्नाटकात राज्यात आज पहिल्याच दिवशी ४५ कोटींची दारू विकली गेली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने माहिती दिली आहे. ४० दिवसानंतर दारूची दुकाने उघडली. त्यामुळे नागरिकांनी देशभरात दारुच्या दुकानांबाहेर रांगा लावल्या होत्या.
कर्नाटकात पहिल्याच दिवशी ४५ कोटींची दारू विक्री, ४० दिवसानंतर उघडली दुकाने
दारु विकताना सोशल डिस्टंसिंग पाळण्याचा नियम सरकारने घालून दिला आहे. मात्र, अनेक ठिकाणी लांबच लांब रांगा लागल्याने सोशल डिस्टंसिंगचा बोजवार उडाला.
दारु विकताना सोशल डिस्टंन्सिंग पाळण्याचा नियम सरकारने घालून दिला आहे. मात्र, अनेक ठिकाणी लांबच लांब रांगा लागल्याने सोशल डिस्टंन्सिंगचा बोजवार उडाला. अनेक ठिकाणी पोलिसांना लाठीचार्जही करावा लागला. दारुची दुकाने सुरू करून सरकारला महसुल तर मिळेल मात्र, नियमांचे पालन केले नाही तर नागरिकांना आणखी धोका पोहचण्याची शक्यता आहे.
अनेक दारुच्या दुकानांवर सॅनिटायझर ठेवण्यात आले आहे. तसेच थर्मलगनने ग्राहकांची तपासणीही करण्यात येत आहे. मात्र, मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने गोंधळ उडत आहे.