मुंबई - कर्नाटक आघाडी सरकारच्या राजीनामा दिलेल्या बंडखोर आमदारांना मुंबईतील सोफीटेल हॉटेलमधून अज्ञात स्थळी हलवण्यात आले आहे. याआधी त्यांना पुण्याला नेण्याचा बेत होता. नंतर गोव्याला नेण्याचेही ठरवण्यात आले होते. मात्र, अखेर त्यांना मुंबईतच अज्ञात ठिकाणी नेण्यात आले आहे.
कर्नाटक वॉर : बंडखोर आमदारांना मुंबईतून अज्ञात स्थळी हलवले - jds
कर्नाटकातील अवघे १३ महिन्यांचे काँग्रेस-जेडीएस आघाडी सरकार ६ जून रोजी ११ आमदारांनी राजीनामे दिल्यामुळे मोडकळीस आले आहे. अद्याप हे राजीनामे संमत होणे बाकी आहे.
काँग्रेसच्या आमदारांची काल बंगळुरु येथे बैठक झाली. त्यात काँग्रेसच्या २२ आमदारांनी मंत्रिपदाचे राजीनामे प्रदेश अध्यक्ष दिनेश गुंडू राव यांच्याकडे सोपवले. तसेच, जेडीएसच्याही सर्व मंत्र्यांनी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांच्याकडे राजीनामे दिले. बंडखोर आमदारांचे मन वळवून त्यांना पुन्हा मंत्रिमंडळात घेता यावे, यासाठी मंत्रिमंडळाच्या पुनर्रचनेचा पर्याय अवलंबण्यात आला आहे. मात्र, सर्व असंतुष्ट आमदारांना सध्या मुंबईतून अज्ञात ठिकाणी नेण्यात आले आहे.
कालपासून कर्नाटकात सत्ताधारी आघाडीचे सरकार वाचवण्यासाठी निकराचे प्रयत्न सुरू आहेत. काल के. सी. वेणुगोपाल, दिनेश गुंडू राव, सिद्धरामय्या, जी. परमेश्वर, एम. बी. पाटील, ईश्वर खांद्रे या काँग्रेस नेत्यांनी अज्ञात ठिकाणी कायदेशीर सल्लागारांशी चर्चा केली. दरम्यान, भाजपने मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे. भाजपचे राज्य प्रदेश अध्यक्ष येदियुराप्पा यांनी आघाडी सरकार विधानसभेत अल्पमतात आल्याचा दावा केला आहे. त्यामुळे त्यांच्यासमोर सत्तेतून बाहेर पडण्याशिवाय पर्याय नाही, असे भाजपने म्हटले आहे. एच. नागेश आणि आर. शंकर या २ अपक्ष आमदारांपैकी एच. नागेश यांनी सरकारमधून बाहेर पडत भाजप सरकारला पाठिंबा देण्याचे जाहीर केले. कर्नाटकातील अवघे १३ महिन्यांचे काँग्रेस-जेडीएस आघाडी सरकार ६ जून रोजी ११ आमदारांनी राजीनामे दिल्यामुळे मोडकळीस आले आहे. दरम्यान, राजीनामा दिलेल्यांपैकी एच. विश्वनाथ या आमदाराने एकंदर १४ आमदारांनी विधानसभा अध्यक्ष के. आर. रमेश कुमार यांच्याकडे राजीनामा सोपवल्याचे म्हटले होते. अद्याप हे राजीनामे संमत होणे बाकी आहे.