बंगळुरु - कर्नाटक सरकारला आपले बहुमत सिद्ध करण्यासाठी आज सायंकाळी चार वाजेपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. सोमवारी रात्री उशीरापर्यंत कोणताही निर्णय न झाल्यामुळे मंगळवारी सकाळी 10 वाजेपर्यंत विधानसभेचे कामकाज स्थगित करण्यात आले.
त्यानंतर आज सकाळी १३ बंडखोर आमदारांनी विधानसभेचे अध्यक्ष के. आर. रमेशकुमार यांना पत्र लिहून विधानसभेत हजर राहण्यासाठी चार आठवड्यांची मुदत मागितली आहे.