महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

'बहुमत चाचणी झाल्यास आजच काँग्रस-जेडीएसचे सरकार कोसळेल'

कर्नाटकच्या 12 आमदारांनी विधानसभा अध्यक्षांकडे 4 आठवड्यांचा वेळ मागितला आहे. त्यामुळे ते मंगळवारी विधानसभा अध्यक्षांसमोर उपस्थित राहणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

By

Published : Jul 23, 2019, 2:38 PM IST

कर्नाटक

मुंबई- कर्नाटकातील काँग्रेस-जेडीएस सरकारमधील १२ आमदार अजूनही पवई येथील रेनिसन्स हॉटेलमध्ये आहेत. या आमदारांच्या निलंबनाबाबत मंगळवारी विधानसभा अध्यक्षांनी त्यांना बोलावणे केले होते. परंतु या आमदारांनी वकीलांमार्फत विधानसभा अध्यक्षांकडे पत्र पाठवीले आहे. आमदारांनी विधानसभा अध्यक्षांकडे 4 आठवड्यांचा वेळ मागितला आहे. त्यामुळे ते मंगळवारी उपस्थित राहणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

कर्नाटक राजकीय नाट्य

गेल्या अनेक दिवसांपासून हे आमदार मुंबईत वास्तव्यास आहेत. परंतु यांची दिलजमाई करण्यात काँग्रेस अयशस्वी ठरले आहेत. यामुळे काँग्रेस आणि जेडीएस काही जादू करत आपले सरकार वाचवते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

काँग्रेस-जेडीएस सरकारला आपले बहुमत कर्नाटकमध्ये सिद्ध करायचे आहे. त्यामुळे कर्नाटक आणि मुंबईमध्ये देखील मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता आहे. जर मंगळवारी बहुमत चाचणी झाली तर काँग्रेस आणि जेडीएसचे सरकार कोसळेल असं राजकीय जाणकारांचे मत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details