चित्रदुर्ग(कर्नाटक) - बलात्कार प्रकरणातील पीडिता कोरोना पॉझिटिव्ह आढळली. त्यामुळे तपास करणाऱ्या नऊ पोलिसांसह तरुणीवर उपचार करणाऱ्या दोन डॉक्टरांनाही क्वारंटाइन करण्यात आले आहे.
कर्नाटक: बलात्कार पीडिता कोरोना पॉझिटिव्ह; तपास करणारे 9 पोलीस क्वारंटाईन - police quarantine karnataka
चित्रदुर्ग जिह्यातील एका तरुणीने बलात्कार झाल्याची तक्रार भरमसागर पोलीस ठाण्यात दाखल केली होती. तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र, आरोपी मुंबईवरून परतला होता.
चित्रदुर्ग जिह्यातील एका तरुणीने आपल्यावर बलात्कार झाल्याची तक्रार भरमसागर पोलीस ठाण्यात दाखल केली होती. तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली. पोलिसांना आरोपीही सापडला. मात्र, तो मुंबईवरून परतला असल्याचे तपासात पुढे आले. त्यामुळे पोलिसांनी पीडित तरुणीची कोरोना चाचणी केली, तर तिची चाचणी पॉझिटिव्ह आली.
बलात्कारानंतर तरुणीला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथील दोन डॉक्टरांनाही क्वारंटाइन करण्यात आले आहे, तर नऊ पोलिसांना होम क्वारंटाइन करण्यात आले आहे.