महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

'कर्नाटक सरकार आंध्र प्रदेशसोबत पाणीवाटपावर विचार करतयं'

कर्नाटकातील चिक्काबाल्लापूर जिल्ह्यातील गोवरीबदनूर तालुक्यातील पाणीटंचाईच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकार आंध्र प्रदेशबरोबर पाणीवाटपावर विचार करत आहे, असे जिल्हा प्रभारी मंत्री के. सुधाकर यांनी सांगितले.

मंत्री के. सुधाकर
मंत्री के. सुधाकर

By

Published : Aug 8, 2020, 9:18 AM IST

बंगळुरू -कर्नाटकातील चिक्काबाल्लापूर जिल्ह्यातील गोवरीबदनूर तालुक्यातील पाणीटंचाईच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकार आंध्र प्रदेशबरोबर पाणीवाटपावर विचार करत आहे, असे जिल्हा प्रभारी मंत्री के. सुधाकर यांनी सांगितले. गोवारीबिदनूर येथील एका कार्यक्रमात ते बोलत होते.

तालुक्यातील पिण्याच्या पाण्याची ही मुख्य समस्या आहे. पाणी प्रश्न मिटवण्यासाठी राज्य सरकार शेजारी राज्य आंध्र प्रदेशातून 10-15 टीएमसी पाणी मिळवण्यासाठी विचार करीत आहे. यासंदर्भात जलसंपदा मंत्र्यांसमवेत चर्चेची एक फेरी झाली असून लवकरच ती कार्यान्वित होईल, असे ते म्हणाले.

दरम्यान, शुक्रवारी मंत्र्यांनी नगरोथ्थना प्रकल्पांतर्गत 7.29 कोटी रुपयांची विविध विकासकामे सुरू केली. वैद्यकीय सहाय्य योजनेंतर्गत लाभार्थ्यांना प्रत्येकी पाच हजार रुपयांचे धनादेश वाटप केले. सुधाकर यांनी आश्रय योजनेतील लाभार्थ्यांना मालकी प्रमाणपत्र व पथ विक्रेत्यांना ओळखपत्रांचे वाटप केले.

चिक्काबाल्लापूरच्या विकासासाठी आमचे सरकार वचनबद्ध आहे. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात उद्योग स्थापन करण्याचे आमचे उद्दीष्ट आहे. यंदा मुसळधार पावसामुळे 17 जिल्ह्यांना फटका बसला आहे. संपूर्ण परिस्थितीवर मुख्यमंत्र्याचे लक्ष असून गरजूपर्यंत मदत उपाययोजना पोहचल्या आहेत का, याची खात्री ते करुन घेत आहेत, असे सुधाकर म्हणाले. बाधित लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. आमचे सरकार पूर परिस्थितीशी प्रभावीपणे सामोरे जात आहे, असेही ते म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details