मुंबई- सर्वोच्च न्यायालयाने कर्नाटकच्या सर्व बंडखोर आमदारांना विधानसभा अध्यक्ष रमेश कुमार यांच्या कार्यालयात संध्याकाळी ६ पर्यंत हजर होण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे, मुंबईतील हॉटेलमध्ये वास्तव्यास बंडखोर आमदार बंगळुरूला जाण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झाले आहेत. बंगळुरूमध्ये दाखल झाल्यानंतर ते थेट के. आर रमेशकुमार यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या कार्यालयात जाणार आहेत.
कर'नाटक' : बंगळुरूला जाण्यासाठी मुंबईच्या विमानतळावर बंडखोर आमदार दाखल - mla
मुंबईतील हॉटेलमध्ये वास्तव्यास असलेले बंडखोर आमदार बंगळुरूला जाण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झाले आहेत. ते सर्वजण बंगळुरूमध्ये दाखल झाल्यानंतर थेट के. आर रमेशकुमार यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या कार्यालयात जाणार आहेत.
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी सुनावणी घेतना बंडखोर आमदारांना विधानसभा अध्यक्षांची भेट घेण्याचे आदेश दिले होते. आज विधानसभा अध्यक्षांसोबत होणाऱ्या भेटीत आमदारांना राजीनामा देण्याची संधी देण्यात आली आहे. कर्नाटक विधानसभेचे अध्यक्ष रमेश कुमार राजीनामे संमत करण्यास विलंब करत आहेत, या कारणाने बंडखोर आमदारांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, विधानसभा अध्यक्ष कुमार यांनी 'मी राजीनामा देणाऱ्या आमदारांना माझ्यासमोर हजर होण्यास सांगितले होते. त्यासाठी पुरेसा वेळ दिला होता. मात्र, ते माझ्यासमोर आले नाहीत,' असे म्हटले होते. संबंधीचे पत्र त्यांनी राज्यापाल वजूभाई वाला यांना सादर केले केले होते. आता न्यायालयाने बंडखोर आमदारांना अध्यक्षांसमोर हजर होण्याचे निर्देश दिले आहेत.