महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

अंगातील भूत काढण्यासाठी मांत्रिकाची मारहाण; तीन वर्षांच्या चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू - कर्नाटक मांत्रिक बळी

आपल्या मुलीला एखाद्या भुताने पछाडल्यामुळेच हे होत आहे, असे या दाम्पत्याला वाटले. त्यामुळे, यावर उपाय करण्यासाठी हे दाम्पत्य आपली मुलगी पूर्णिकाला घेऊन राकेश नावाच्या मांत्रिकाकडे गेले होते. यावेळी राकेशनेही या दाम्पत्याला सांगितले, की तुमच्या मुलीच्या शरीरात भूत आहे. त्यानंतर हे भूत काढण्यासाठी म्हणून राकेशने एका काठीने या मुलीला मारण्यास सुरुवात केली.

Karnataka: Kid dies after 'exorcist' thrashes her to rid her of 'ghost'
अंगातील भूत काढण्यासाठी मांत्रिकाची मारहाण; तीन वर्षांच्या चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू

By

Published : Sep 29, 2020, 9:10 AM IST

बंगळुरू :अंगातील भूत काढण्यासाठी मांत्रिकाने केलेल्या मारहाणीत तीन वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कर्नाटकच्या चित्रदुर्ग जिल्ह्यातील ही घटना आहे. याप्रकरणी या नराधम मांत्रिकाला आणि त्याच्या भावाला अटक करण्यात आली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, प्रवीण आणि शामला या दाम्पत्याच्या तीन वर्षीय मुलीला काही दिवसांपासून दुःस्वप्ने पडत होती. यामुळे ती अनेकदा रात्री घाबरुन उठत असे. आपल्या मुलीला एखाद्या भुताने पछाडल्यामुळेच हे होत आहे, असे या दाम्पत्याला वाटले. त्यामुळे, यावर उपाय करण्यासाठी हे दाम्पत्य आपली मुलगी पूर्णिकाला घेऊन राकेश नावाच्या मांत्रिकाकडे गेले होते.

यावेळी राकेशनेही या दाम्पत्याला सांगितले, की तुमच्या मुलीच्या शरीरात भूत आहे. त्यानंतर हे भूत काढण्यासाठी म्हणून राकेशने एका काठीने या मुलीला मारण्यास सुरुवात केली. काही वेळाने ही चिमुरडी बेशुद्ध पडली. त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यासाठी नेताना रस्त्यातच तिचा मृत्यू झाला.

यानंतर राकेश आणि त्याचा भाऊ परशुराम यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांना अटक करण्यात आली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक जी. राधिका यांनी याबाबत माहिती दिली.

हेही वाचा :'मला कोरोनाची बाधा झाली तर, मी ममता बॅनर्जींना मिठी मारेन', भाजप नेत्यास वक्तव्य अंगलट

ABOUT THE AUTHOR

...view details