महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

'निर्भया फंड'चा गैरवापर? चौकशी कमिटी बसवण्यासंबंधी गृहसचिवांना महिला अधिकाऱ्याचे पत्र - IPS D. Roopa

आयपीएस अधिकारी डी. रुपा यांनी निर्भया सेफ सिटी प्रोजेक्टमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप केला आहे. या प्रकल्पाचे चेअरमन अतिरिक्त पोलीस आयुक्त हेमंत निंबाळकर यांची चौकशी करण्याबाबत त्यांनी गृहसचिवांना पत्र लिहिले आहे. हा प्रकल्प 619 कोटींचा आहे.

IPS D. Roopa
'निर्भया फंड'चा गैरवापर? चौकशी कमिटी बसवण्यासंबंधी गृहसचिवांना महिला अधिकाऱ्याचे पत्र

By

Published : Dec 28, 2020, 1:23 PM IST

बंगळुरू -या संपूर्ण प्रोजेक्टमध्ये सातत्य राखण्यात आलेलं अपयश, निंबाळकर यांच्या भूमिकेवर संशय निर्माण करत असल्याने या टेंडरची चौकशी करण्यासाठी कमिटी नेमावी, अशी मागणी रुपा यांनी केली आहे. निंबाळकर यांची भूमिका संशयास्पद असल्याने त्यांनी हायर ऑथोरिटीची दिशाभूल केल्याचा संशय बळावला आहे, असे रुपा म्हणाल्या. काही तासांनंतरच निंबाळकर यांनी हा आरोप फेटाळला आहे.

रुपा यांनी मुख्य सचिव टी.एम. विजया भास्कर यांना पत्र लिहिले आहे. यामध्ये निंबाळकर यांची टेंडर कमिटीच्या चेअरमन पदावरून हकालपट्टी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. हा प्रकल्प केंद्र सरकारच्या निर्भया फंड अंतर्गत येत असून देशभरातील महिलांच्या सुरक्षिततेसाठी तसेच आत्मसन्मान कायम ठेवण्यासाठी आवश्यक आहे. ही केंद्राच्या महत्वकांक्षी योजनांपैकी एक योजना आहे.

अतिरिक्त पोलीस आयुक्त निंबाळकर यांनी चुकीची माहिती सादर करून सत्य लपवले आहे. तसेच दिशाभूल करणारी माहिती सरकार आणि माध्यमांना पुरवल्याचा आरोप डी.रुपा यांनी केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details