बंगळुरू - कर्नाटक उच्च न्यायालयाने काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांची याचिका फेटाळली आहे. या याचिकेत दिग्विजय सिंह यांनी बंडखोर आमदारांना भेटण्याची मागणी केली होती.
मध्यप्रदेश सत्तापेच : दिग्विजय सिंह यांची 'ती' याचिका फेटाळली
काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांची बंडखोर आमदारांना भेटण्याची परवानगी मागणारी याचिका कर्नाटक न्यायालयाने फेटाळली आहे.
काँग्रेसचे २२ बंडखोर आमदार बंगळुरूतील रामदा हॉटेलमध्ये थांबले आहेत. त्यांची भेट घेण्यासाठी दिग्विजय सिंह रामदा हॉटेलमध्ये पोहोचले होते. मात्र, त्यांची पोलिसांनी आमदारांशी भेट होऊ दिली नाही. त्यावर दिग्विजय सिंह यांनी कर्नाटक न्यायालयात बंडखोर आमदारांना भेटण्याची परवानगी मागणारी याचिका दाखल केली होती.
काँग्रेसच्या बंडखोर आमदारांची भेट घेण्यावर दिग्विजय सिंह ठाम आहेत. आमदार हे लाखो जनतेचे प्रतिनिधी आहेत. जर आमदारांना काही अडचण असेल तर ते विधानसभा अध्यक्षांसोबत आणि सभागृहात बोलू शकतात, तशी संविधानात व्यवस्था आहे. पक्षाच्या अधिकृत प्रतिनिधींशीही ते बोलू शकतात, दुसरा कोणताही मार्ग हा लोकशाहीचे अपहरण आहे', असे ट्विट दिग्विजय सिंह यांनी केले आहे.