महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

LIVE : कर'नाटक' कुमारस्वामींनी घेतली शिवकुमार यांची भेट, मात्र अजूनही विधानसभेत उपस्थिती नाही

विश्वासदर्शक ठरावावर मतदान करण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे सोमवारीही कर्नाटक विधानसभेतील गोंधळ कायम राहिला. रात्री उशीरापर्यंत यावर कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. विधानसभेचे अध्यक्ष के. आर. रमेशकुमार यांनी आज (मंगळवार) चार वाजेपर्यंत निर्णायक चर्चा संपवावी असे निर्देश दिले.

कर'नाटकी' गुऱ्हाळ आज तरी संपणार का?

By

Published : Jul 23, 2019, 9:12 AM IST

Updated : Jul 23, 2019, 3:14 PM IST

बंगळुरु - कुमारस्वामी सरकारला आपले बहुमत सिद्ध करण्यासाठी सोमवारपर्यंतची तिसरी मुदत देण्यात आली होती. त्यानुसार कुमारस्वामी यांनी विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडला. मात्र, अध्यक्षांनी बंडखोर आमदारांच्या राजीनाम्यांबाबत निर्णय दिल्याशिवाय या ठरावावर मतदान घेऊ नये, असा आग्रह काँग्रेसच्या सदस्यांनी धरला. यावेळी, विश्वासदर्शक ठरावावर आजच मतदान घेतले जावे, अशी मागणी भाजपने केली. त्यामुळे सभागृहात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली.

Live Update -

  • आम्ही बंडखोरांना बंदी बनवू शकलो असतो, मात्र आमचा त्यांच्यावर विश्वास होता त्यामुळे आम्ही तसे केले नाही. त्यांना इथे येऊन या सरकारविरोधात मतदान करायचे असल्यास करु द्यावे- डी. के. शिवकुमार
  • भाजप बंडखोर नेत्यांची दिशाभूल करुन त्यांचे राजकीय भवितव्य उध्वस्त करेल- डी. के. शिवकुमार
  • भाजपने नाही तर बंडखोर नेत्यांनी खुपसला पाठीत खंजीर; ते लोक भाजपच्या बाबतीतही हेच करतील- डी. के. शिवकुमार
  • बंडखोर आमदारांच्या वकीलांनी विधानसभा अध्यक्षांची त्यांच्या कक्षात भेट घेतली.
  • कुमारस्वामींची अनुपस्थिती हेच दर्शविते की ते करदात्यांचा पैसा असाच लुटून वाया घालवणे सुरु ठेवणार- भाजप.
  • कुमारस्वामींनी घेतली शिवकुमार यांची भेट, मात्र अजूनही विधानसभेत उपस्थिती नाहीच.
  • आज बहुमतावर मतदान झाले नाही तर बंडखोर आमदारांवरील कारवाईची सुनावणी उद्या होईल- सुप्रीम कोर्ट.
  • बंडखोर आमदारांची सुनावनी सुप्रीम कोर्टात सुरु.
  • बंडखोर आमदारांना चार आठवडे मुदत हवी, तर विश्वासदर्शक ठराव चार आठवडे पुढे ढकला- काँग्रेसची मागणी
  • भाजपने सत्तेत आल्यास बंडखोर आमदारांना मंत्रिपद देऊ नये- खादेर
  • विधानसभेचे अध्यक्ष रमेश कुमार बंडखोर आमदारांना भेटण्यासाठी विधानभवनाबाहेर.
  • विधानसभेचे कामकाज सुरु, मात्र कुमारस्वामींसह सरकारचे अनेक आमदार अनुपस्थित, अध्यक्षांनी व्यक्त केली नाराजी.

या गोंधळामुळे कुमारस्वामी सरकारने बहुमत सिद्ध करण्यासाठी आणखी दोन दिवसांची मुदतवाढ मागितली. मात्र, ही मागणी फेटाळण्यात आली. विधानसभा अध्यक्ष रमेशकुमार यांनी सोमवारीच हे मतदान पार पडावे यासाठी प्रयत्न केला. ठरावावरील मतदान लांबवणे हा या सभागृहाचा तसेच माझा अवमान ठरेल, असे मत त्यांनी मांडले.

मात्र, तरीही सोमवारी रात्री उशीरापर्यंत याबाबत कोणताही निर्णय झाला नाही. यामुळे आज (मंगळवार) सकाळी 10 वाजेपर्यंत कामकाज स्थगित करण्यात आले. दरम्यान, विधानसभेचे अध्यक्ष के. आर. रमेशकुमार यांनी आज (मंगळवार) चार वाजेपर्यंत निर्णायक चर्चा संपवावी असे निर्देश दिले. त्यानंतर 6 वाजेपर्यंत बहुमत चाचणी पूर्ण होईल, असे रमेशकुमार म्हणाले.

कर्नाटक राज्य विधानसभेत एकूण २२५ सदस्यसंख्या आहे. बहुमत सिद्ध करण्यासाठी कुमारस्वामी सरकारला ११३ पेक्षा अधिक सदस्यसंख्या आवश्यक आहे.

Last Updated : Jul 23, 2019, 3:14 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details