बंगळुरू - आपण दलित समुदायातील असल्यामुळे आपल्याला कर्नाटकचे मुख्यमंत्रीपद ३ वेळा नाकारण्यात आले, असा आरोप कर्नाटकचे उप मुख्यमंत्री जी. परमेश्वरा यांनी केला आहे.
'दलित असल्यामुळेच ३ वेळा मुख्यमंत्रीपद नाकारले' - chief minister
सरकारी पातळीवरही दलितांसोबत भेदभाव होत आहे. दलितांना आरक्षण देण्यात आले असले तरीही बढतींमध्ये त्यांच्यावर अन्यायच होतो, असेही परमेश्वरा यांनी नमूद केले.
पी. के. बसवलिंगप्पा आणि के. एच. रंगनाथ यांना मुख्यमंत्री होता आले नाही. तसेच मल्लिकार्जुन खरगे यांनाही मुख्यमंत्री बनता आले नाही. माझी स्वत:ची ३ वेळा ही संधी चुकली. त्यामुळे मला उपमुख्यमंत्री पद सोपवण्यात आले, असे परमेश्वरा यांनी म्हटले आहे. ते दावंगर येथे आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते.
सरकारी पातळीवरही दलितांसोबत भेदभाव होत आहे. दलितांना आरक्षण देण्यात आले असले तरीही बढतींमध्ये त्यांच्यावर अन्यायच होतो, असेही परमेश्वरा यांनी नमूद केले. कर्नाटकात काँग्रेस आणि जनता दल यांच्या संयुक्त सरकारमध्ये सुरू असलेल्या राजकीय संघर्षादरम्यान परमेश्वरा यांनी हे वक्तव्य केले आहे.