नवी दिल्ली - काँग्रेसचे कर्नाटकातील संकटमोचक अशी ओळख असलेले दिग्गज नेते डी. के. शिवकुमार यांची कर्नाटक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. दिनेश गुंडुराव यांच्या जागी शिवकुमार यांची नियुक्ती झाली आहे. तर दिल्ली प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदी अनिल चौधरी यांची नियुक्ती केली आहे. ते सुभाष चौपडा यांची जागा घेणार आहेत.
संकटमोचक डी. के. शिवकुमार यांची कर्नाटक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती - दिल्लीच्या काँग्रेस अध्यक्षपदी अनिल चौधरी यांची नियुक्ती
काँग्रेसचे कर्नाटकातील संकटमोचक अशी ओळख असलेले दिग्गज नेते डी. के. शिवकुमार यांची कर्नाटक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
ईश्वर खांदे, सतिश जारकीहोळी आणि सलीम अहमद यांची कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. तसेच सोनिया गांधी यांनी अभिषेक दत्त, जयकिशन, मुदित अग्रवाल, अली हसन आणि शिवानी चोप्रा यांची दिल्ली काँग्रेस उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे.
शिवकुमार वोक्कालिंगा समुदायाचे नेते आहे. कर्नाटकात ते डी.के.एस च्या नावाने प्रसिद्ध आहेत. सिद्धारामय्या सरकारमध्ये ते ऊर्जामंत्री होते. तर 2009 मध्ये . शिवकुमार यांना काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष बनविण्यात आले होते. कुमारस्वामी यांच्या सरकारमध्ये शिवकुमार जल संसाधन मंत्री होते.