महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

अविश्वास प्रस्तावास सामोरे जाण्यास तयार - मुख्यमंत्री कुमारस्वामी - confidence

भाजपने जर अविश्वास ठराव आणला तर त्याला सामोरे जाण्यास तयार असल्याचे कुमारस्वामी सरकारने म्हटले आहे.

कुमारस्वामी

By

Published : Jul 11, 2019, 11:48 PM IST

बंगळुरु - कर्नाटकात सध्या राजकीय नाट्य सुरू आहेत. भाजपने जर अविश्वास ठराव आणला तर त्याला सामोरे जाण्यास तयार असल्याचे कुमारस्वामी सरकारने म्हटले आहे. मुख्यमंत्री कुमारस्वामी यांच्या नेतृत्वाखालीच कॅबिनेटची बैठक पार पडली.


कर्नाटकात काँग्रेस-जेडीएस सरकारचं अस्तित्व धोक्यात आहे. बंडखोर आमदारांवर निर्णय घेण्यासाठी कुमारस्वामी यांच्या नेतृत्वाखालीच कॅबिनेट बैठक पार पडली. यामध्ये राजकीय घडामोंडीवर चर्चा झाली आहे. आम्ही आतापर्यंत भाजपचे सर्व हल्ले परतवले आहेत. सरकारला अस्थिर करण्याचा हा भाजपचा सहावा प्रयत्न असल्याचे ग्रामविकास मंत्री कृष्ण गौडा यांनी म्हटले.


सध्या कर्नाटक सरकारवर टांगती तलवार आहे. सरकारला वाचवण्यासाठी काँग्रेस-जेडीएस प्रयत्न करत आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सर्व मंत्र्यांनी एकजुटीने या संकटाचा सामना करण्याचा निश्चय केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details