बंगळुरु - कर्नाटकात वैद्यकीय निष्काळजीपणाचे एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. वेळेत रुग्णवाहिका न आल्याने कोरोनाबाधित रुग्णाला 1 किलोमीटर पायी चालत जाऊन रुग्णालयात भरती होण्याची वेळ आली. राज्यातील बेलारी जिल्ह्यात कुडलागी गावात ही घटना घडली.
कर्नाटक: रुग्णवाहिका वेळेत न आल्यानं कोरोनाग्रस्त पायी चालत पोहोचला रुग्णालयात - COVID patient walks to hospital
कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर एका व्यक्तीला रुग्णालयात भरती करण्यात येणार होते. मात्र, बराच वेळ वाट पाहिल्यानंतरही रुग्णवाहिका आली नाही. त्यामुळे पायी चालत रुग्णालयात जाण्याचा निर्णय रुग्णाने घेतला.
कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर एका व्यक्तीला रुग्णालयात भरती करण्यात येणार होते. मात्र, बराच वेळ वाट पाहिल्यानंतरही रुग्णवाहिका आली नाही. त्यामुळे पायी चालत रुग्णालयात जाण्याचा निर्णय रुग्णाने घेतला. रुग्णालयात पोहोचून कोरोनाबाधित व्यक्तीने आरोग्य कर्मचाऱ्यांची तक्रार केली. रुग्णाच्या कुटुंबियांनीही रुग्णालय प्रशासनाविरोधात तक्रार केली आहे.
देशामध्ये कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असताना वैद्यकीय निष्काळजीपणाची प्रकरणे समोर येत आहेत. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णाचा मृतदेह रिक्षातून नेण्यात आल्याची घटनाही घडली आहे. तसेच अनेक मृतदेह रुग्णालयात सापडतही नाहीत. उपचारामध्येही हरगर्जीपणा केल्याचे आरोप रुग्णांच्या कुटुंबियांकडून करण्यात येत आहेत. सर्वोच्च न्यायालयानेही दिल्ली सरकारच्या हलगर्जीपणावर ताशेरे ओढले आहेत.