नवी दिल्ली - तुझे डोके आहे की खोके, हे आपण नेहमीच ऐकत आसतो. मात्र कर्नाटकातील एका महाविद्यालयात विद्यार्थांच्या डोक्यात शिक्षकांनी चक्क खोके घातले आहे. हा कार्ड बॉक्स घातलेला फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
पहावे ते नवलंच! परीक्षेमध्ये नक्कल करू नये म्हणून डोक्यात घातले चक्क खोके -
कर्नाटकातील एका महाविद्यालयात विद्यार्थांच्या डोक्यात शिक्षकांनी चक्क खोके घातले आहे.
![पहावे ते नवलंच! परीक्षेमध्ये नक्कल करू नये म्हणून डोक्यात घातले चक्क खोके](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-4797366-625-4797366-1571423088701.jpg)
कर्नाटक राज्यातील हवेरी भागातील भगत प्री-युनिव्हर्सिटी महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना नक्कल करून थांबवण्यासाठी अनोखी शक्कल लढवली आहे. परिक्षेदरम्यान विद्यार्थांच्या डोक्यात कार्ड बॉक्स घातले आहे. त्या कार्ड बॉक्समधून विद्यार्थांला फक्त स्व:ताचाच पेपरच दिसेल अश्या प्रकारे ते कापण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थी केवळ पेपरमध्येच बघू शकतात. डोक्यात कार्ड बॉक्स घातल्यामुळे ते आजूबाजूला मान देखील वळवू शकत नाहीत.
आजच्या गतिमान युगात अगदी शालेय पातळी वरील परीक्षापासून ते पदव्युत्तर परीक्षेपर्यंत कुठलीही परीक्षा असो तिला"कॉपी"चा विळखा हा ठरलेलाच असतो. ती थांबवण्यासाठी अनेक प्रयत्न केले जातात. याआधी २०१३ मध्ये थायलंडमध्ये देखील कॉपी थांबवण्यासाठी पेपरपासून बनवलेले हेल्मेट घालण्यात आले होते.